Border 2 Announcement : सनी देओलकडून ‘बॉर्डर 2’ची घोषणा, 27 वर्षांनी चित्रपटाचा सिक्वेल येणार
मोशन पोस्टर शेअर करत अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
Border 2 Announcement : अभिनेता सनी देओलने नुकतीच ‘बॉर्डर 2’ (Border 2)चित्रपटाची घोषणा केली आहे. मोशन पोस्टर शेअर करत अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘गदर 2’ नंतर आता ‘बॉर्डर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने समी देओलचे चाहते फारच आनंदाच आहेत. सनी देओल(Sunny Deol)चा ‘गदर 2’(Gadar 2) चित्रपट गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालणारा चित्रपट ठरला. 2023 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता. अशातच आता सनी देओलने त्याच्या ‘बॉर्डर 2’ चित्रपटची घोषणा केली आहे. तब्बल 27 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ‘बॉर्डर’ चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (हेही वाचा:Gadar 2 Success Party: Sunny Deol आयोजित 'Gadar 2' सक्सेस पार्टीसाठी शाहरुख, सलमान, आमिर खान आणि शिल्पा शेट्टी यांच्यासह दिग्गज स्टार उपस्थित)
1197 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ हा मल्टीस्टारर चित्रपट होता. त्यासारखा दुसरा चित्रपट होणे नाही अशी त्याकाळातील काहीची चित्रुट पाहील्यावर प्रतिक्रीया होती. नुकताच चित्रपटाचा प्रोमो रिलीज झालेला आहे. या प्रोमोमध्ये, 27 वर्षांपूर्वी एका फौजीने शब्द दिला होता की, तो पुन्हा येईल. दिलेला शब्द पूर्ण करत आता तो फौजी परत येतोय.
अनुराग सिंह ‘बॉर्डर 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करणार आहेत. ‘बॉर्डर 2’साठी अनु मलिक, मिथुन संगीत देणार आहेत जावेद अख्तर या चित्रपटासाठी गाणी लिहिणार आहेत. तर सोनू निगम गाणे गाणार आहेत. सध्या या चित्रपटाची स्टारकास्ट लिस्ट समोर आलेली नाही.