Year Ender 2019: कार्तिक आर्यन ते विकी कौशल, या बॉलीवूड Celebs नी केलं यावर्षी Breakup

या ग्लॅमरस विश्वात नक्की कोणाचं कोणाशी अफेअर चालू आहे हे तर आपल्याला माहितच असेल परंतु, 2020 या वर्षात नक्की कोणते बॉलीवूड सेलेब्स आपल्या पार्टनर सोबत ब्रेकअप करत वेगळे झाले ते आज पाहूया...

Bollywood Breakups (Photo Credits: Instagram)

Bollywood Breakups in 2019: बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलिब्रिटी अफेअर्स आपण या आधीही ऐकले आहेत. तसेच अनेक कलाकार आपल्या पार्टनरपासून वेगळेही झाले. बॉलीवूडच्या या झमगती दुनियेत, एखादा कलाकार आज एका अभिनेत्रींसोबत रिलेशनमध्ये असतो तर उद्या दुसरीच अभिनेत्री त्याच्या आयुष्यात पाहायला मिळते. अशा या ग्लॅमरस विश्वात नक्की कोणाचं कोणाशी अफेअर चालू आहे हे तर आपल्याला माहितच असेल परंतु, 2019 या वर्षात नक्की कोणते बॉलीवूड सेलेब्स आपल्या पार्टनर सोबत ब्रेकअप करत वेगळे झाले ते आज पाहूया...

सारा अली खान - कार्तिक आर्यन

वर्षाच्या सुरुवातीलाच सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एकत्र 'आजकाल 2' हा चित्रपट केला. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर त्यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं. परंतु, काही दिवसांपूर्वी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या दोघांचं ब्रेकअप झालं आहे. तसेच काही जण असंही म्हणतात की या दोघांनी ब्रेकअप न करता ब्रेक घेतला आहे.

विकी कौशल- हरलीन सेठी

हरलीन आणि विकी यांच्या अफेअरच्या चर्चा फार आधीपासून पाहायला मिळत होत्या. परंतु, यावर्षी त्यांचं ब्रेकअप झालं असल्याचं बोललं जातंय. कारण, हरलीनने विकीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. तसेच तिने मध्यंतरी हार्ट ब्रेक झाल्याचा संदेश असणाऱ्या काही पोस्ट देखी सोशल मीडियावरून शेअर केल्या होत्या.

श्रुती हसन- मायकेल कॉरसेल

कमल हासन यांची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री श्रुती हासन आणि मायकेल यांच्यात असलेलं नातं 2016 पासून सुरु झालं होतं. दोघं हमखास एकत्र दिसायचे. तसेच दोघं लग्नाच्या बंधनात देखील अडकणार होते. परंतु, त्या आधीच दोघांमधील नातं तुटलं आहे.

इलियाना डिक्रूज- अँड्र्यू नीबोन

इलियाना आणि तिचा बॉयफ्रेंड अँड्र्यू हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. परंतु, त्या अद्धिच दोघांनी ब्रेकअप केलं आहे. इतकंच नाही तर, इलियानाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे अँड्र्यूसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.