Year Ender 2019: अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, सई मांजरेकर यांच्यासहित 'या'कलाकारांनी यंदा बॉलिवूड मध्ये केले पदार्पण; पहा फोटो
यंदाचे वर्ष बॉलिवूड नवख्या मंडळींसाठी अगदी हिट ठरले होते. यामध्ये काही स्टार किड्सनी तर काही आउट साईडर्सनी येऊन हे वर्ष गाजवले. ही मंडळी कोण हे आज आपण पाहणार आहोत.
बॉलीवूड (Bollywood) मध्ये अनेक दशकांपासून घट्ट पकड असलेल्या कलाकारांच्या सोबतच अनेकदा नवे चेहरेही रसिकांना भुरळ पाडून जातात. मागील काही वर्षात असे अनेक नवे चेहरे वारंवार समोर येत आहेत, काही सिनेमांमध्ये तर अगदी छोटासा रोल करतानाही या कलाकारांनी आपली छाप पाडली आहे. यंदाचे वर्षही अश्या नवख्या मंडळींसाठी अगदी हिट ठरले होते. यामध्ये काही स्टार किड्सनी तर काही आउट साईडर्सनी येऊन हे वर्ष गाजवले. ही मंडळी कोण हे आज आपण पाहणार आहोत.
Year Ender 2019: बॉलीवूड मधील 'ही' Top 5 गाणी तुम्ही ऐकली आहेत का?
अनन्या पांडे
चंकी पांडे यांची कन्या अनन्या पांडे हिने यंदा पुनीत मल्होत्रा याच्या स्टुडन्ट ऑफ द इयर 2 मधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले, जरी चित्रपटाने फार यशस्वी कामगिरी केली नसली तरी अनन्या चे काम आणि चेहरा यात नक्कीच भाव खाऊन गेला. तिची नटखट कलाकारी आणि स्टाईल स्टेटमेंट कौतुकाचा विषय ठरली.
View this post on Instagram
A long time ago in a galaxy far, far away 🪐For Star Screen Awards, 2019 ✨🖤
A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on
तारा सुतारिया
अनन्या पांडे सोबतच स्टुडन्ट ऑफ द इयर 2 मधून तारा सुतारिया हिने देखील आपले नशीब आजमावले होते. हॉट लुक्स आणि डान्सिंग स्किल पाहून ती काहीच क्षणात तरुणाईचा आवडता चेहरा बनली होती.
मिझान जाफरी आणि शर्मिन सेगल
मलाल सिनेमात अनेक गाण्यांमध्ये आपल्या हॉट बॉडी मुळे आणि डान्सिंग मुळे चर्चेत आलेला जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी याने शर्मिन सेगल हिच्यासोबत बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली. संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन खाली बनलेली ही क्युट लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
करण कपाडिया
ट्विंकल खन्ना हिचा चुलत भाऊ आणि डिम्पल कपाडिया हिचा मुलगा करणने ब्लँक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनी देओल सोबत आलेला हा थ्रिलर छ्त्रपती प्रेक्षकांमध्ये आणि स्क्रीनवर तितकंसं थ्रिल निर्माण करू शकला नाही.
सई मांजरेकर
सलमान खान चा एव्हर हिट दबंग सिरीज मधील चौथ्या भागात महेश मांजरेकर यांच्या कन्येने आपला डेब्यू केला. चुलबुल पांडे म्हणजेच सलमान सोबत सई स्क्रीनवर रोमान्स करताना पाहायला मिळत आहे.
सिद्धांत चतुर्वेदी
रणवीर सिंह चा 2019 मधील सर्वात मोठा चित्रपट गल्ली बॉय मध्ये सिद्धांत ची भूमिका पूरती भाव खाऊन गेली. यापूर्वी देखील त्याने इनसाईड एज या सिरीज मधून काम केले होते.
View this post on Instagram
Vibe hai Vibe hai! ⚡️ @ranveersingh ⚡️ #starscreenawards2019 #GullyBoySeason
A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi) on
बॉलिवूड नेहमीच नव्या नव्या चेहऱ्यांना प्रेक्षकांसमोर आणणारे एक माध्यम ठरले आहे, येत्या वर्षातही असे काही नवे कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत या सर्व मंडळींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)