व्हिडिओ: मर्लिन मुनरो करण्याच्या नादात फसली आणि स्वत:वरच हसली शिल्पा शेट्टी; काय घडलं स्वत:च पाहा
ज्यात ती एका क्रूझवर हॉलिवूडचा एक काळ गाजवलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री 'मर्लिन मुनरो' ची पोज दयायला गेली. आणि तिच्यासोबत जे घडले ते तुम्हालाही अक्षरश: वेडं लावेल.
फिटनेसच्या बाबतीत अव्वल असणारी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) तिच्या फिटनेस मुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती हॉट फोटोशूटमुळेही. मात्र शिल्पाने पहिल्यांदाच स्वत:चा एक हॉट व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करुन स्वत: च मनसोक्त हसली आहे. त्या व्हिडिओच्या खाली तिने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असे आपल्या चाहत्यांना म्हटले आहे. शिल्पा शेट्टी परदेशात सुट्ट्या एन्जॉय करत असताना तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती एका क्रूझवर हॉलिवूडचा एक काळ गाजवलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री 'मर्लिन मुनरो' (Marilyn Monroe) ची पोज दयायला गेली. आणि तिच्यासोबत जे घडले ते तुम्हालाही अक्षरश: वेडं लावेल.
या व्हिडिओत शिल्पा नारिंगी रंगाच्या एका ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने "क्रुझवर माझा 'मर्लिन मर्नो' क्षण. शेवट पर्यंत पाहा.'' असे लिहले आहे.
बॉलिवडूमध्ये आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी शिल्पा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रमेश तौरानी यांच्या प्रॉडक्शन खाली साकारण्यात येणाऱ्या चित्रपटात शिल्पा भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा- शिल्पा शेट्टी डाएट म्हणजे मेंटेन फिगर, कमनीय बांधा, नाजूक कटी; घ्या जाणून
2019 च्या पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून शिल्पा शेट्टी कुंद्रा सकाळी गेट वे ऑफ इंडियावर ( Gateway of India )योगा करण्यासाठी पोहचली होती. मुंबईकर योगाप्रेमीं समवेत शिल्पाने यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा केला आहे.