Web Series Tandav: 'तांडव' अडचणीत; अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखासह निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल
त्यामुळे अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील ओरिजनल कटेंन्ट हेड अपर्णा पुरोहित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा लखनऊ येथील हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अॅमेझॉन प्राइमवरील (Amazon Prime) ‘तांडव’ ही वेबसीरीज ( Web Series Tandav) अडचणीत आणि वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकांनी या ठिकाणी वेबसीरीज विरोधात तक्रारी दिल्या होत्या अखेर प्राप्त तक्रारीवरुन मुंबई पोलिसात 'तांडव' (Tandav) वेबसीरीजविरोधात तक्राल दाखल झाली. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही या वेबसीरीजच्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकासह मेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तांडव’ वेबसीरीजने अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्राप्त तक्रारीवरुन वेबसीरीजे निर्माते हिमांशू कृष्ण मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जाफर, लेखक गौरव सोलंकी आणि वेबसीरीजशी संबंधित असलेल्या इतरही काही मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘तांडव’ वेबसीरीज ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. त्यामुळे अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील ओरिजनल कटेंन्ट हेड अपर्णा पुरोहित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा लखनऊ येथील हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी मुंबई येथील घाटकोपर पोलीस ठाण्यात तांडव वेबसीरीस विरोधात तक्रार दिली होती. याशिवाय भाजप खासदार मनोज कोटक यांनीही तत्कालीन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रामविलास पासवान यांनाही पत्र लिहिले होते. या पत्रात ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सॉर आणण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती.