Naach Meri Rani Song: नोरा फतेही आणि गायक गुरु रंधावा यांचे धमाकेदार गाणे 'नाच मेरी रानी' आले प्रेक्षकांच्या भेटीला, Watch Video
हे गाणे गुरु रंधावा आणि निकिता गांधी यांनी गायिले आहे. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार तनिष्क बाग्ची आहेत. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन बोस्को मार्टिस यांनी केले आहे
गेल्या कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेले नोरा फतेही (Nora Fatehi) आणि गुरु रंधावा (Guru Randhawa) यांचे नवे गाणे 'नाच मेरी रानी' (Naach Meri Rani) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यामधील गुरुचा जबरदस्त आवाज आणि नोरा चा धमाकेदार डान्स यामुळे हे गाणे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. संगीताचे जबरदस्त मिश्रण तुम्हाला या गाण्यातून ऐकायला मिळेल. त्यात दिलबर दिलबर, साकी, हाय गरमी यांसारखी एकाहून एक हिट गाणी देणारी नोरा फतेहीचा एक हटके लूक तुम्हाला या गाण्यात पाहायला मिळणार आहे.
या गाण्यातही नोरा आपल्या डान्सचा तडका मारत प्रेक्षकांना घायाळ करत आहे. हे गाणे गुरु रंधावा आणि निकिता गांधी यांनी गायिले आहे. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार तनिष्क बाग्ची आहेत. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन बोस्को मार्टिस यांनी केले आहे. Nora Fatehi Hot Booti Dance: नोरा फतेही चा समुद्र किना-यावरील हॉट बूटी डान्स सोशल मिडियावर व्हायरल, मिळाले 31 लाखांहून अधिक व्ह्यूज, Watch Video
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये नोरा फतेही ही एक रोबोटिक दाखवली आहे. त्यामुळे यात तिचे थोडे रोबोटिक डान्स मूव्हसुद्धा पाहायला मिळत आहे. या गाण्याला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
अलीकडेच नोरा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात नोरा एका समुद्रकिना-यावर अफलातून डान्स करताना दिसली होती. या व्हिडिओला देखील चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.
काही दिवसांसासाठी ती 'इंडियाज बेस्ट डान्सर' (India's Best Dancer) या कार्यक्रमात अभिनेत्री मलायका अरोराच्या जागी परीक्षक म्हणून पाहुणी परीक्षक म्हणून आली होती. तिच्या येण्याने तिने आपल्या जबरदस्त डान्स स्टाईलने या शो मध्ये जान आणली होती. त्यानंतर अलीकडेच या शो मध्ये मलायका अरोरा परत आली असून नोराने या शो ला अलविदा केले आहे.