Wajid Khan Funeral Pics: वाजिद खान यांच्या अंत्यदर्शनासाठी साजिद खान, आदित्य पांचोलीसह कुटूंबियांची उपस्थिती, पाहा फोटोज
आज पहाटे सर्बन रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
सुप्रसिद्ध संगीतकार वाजिद खान (Wajid Khan) यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड जगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांच्यावर वर्सोव्याच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भाऊ साजिद खान (Sajid Khan), अभिनेता आदित्य पांचोलीसह (Aditya Pancholi) कुटूंबातील जवळच्या व्यक्तींनी हजेरी लावली. आज पहाटे सर्बन रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांना किडनीचीा आजार होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
साजिद-वाजिद याच्या प्रसिद्ध संगीतकारांच्या जोडीतील वाजिद यांच्या निधनाने सर्वांना धक्काच बसला. वाजिद खान यांचे अचानक जाण्याने मनाला चटका लावणारे असल्यामुळे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar), प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन, वयाच्या 43 वर्षी घेतला अखेरचा श्वास
संगीतकारांमध्ये साजिद-वाजिद प्रचंड लोकप्रिय होती. यातील वाजिद खान यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. या जोडीने आतापर्यंत एक था टायगर, वॉन्टेड, मैने प्यार क्यूं किया यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. सलमान खानच्या बहुतांशी चित्रपटातील गाण्यांना या जोडीने संगीत दिले आहे.