विद्या बालन हिने ब्लाऊज पीस आणि रबर बँड पासून बनवला मास्क; 'आपला देश, आपला मास्क' म्हणत चाहत्यांसोबत शेअर केला व्हिडिओ (Watch Video)

यासाठी विद्या बालन हिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने ब्लाऊज पीस आणि रबर बँडच्या साहाय्याने मास्क बनवण्याची पद्धत दाखवली आहे.

Vidya Balan (Photo Credits: Instagram)

देशात कोरोना व्हायरस संकटाची चाहूल लागताच मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. सुरुवातीला तुरळक माणसांच्या चेहऱ्यावर दिसणारा मास्क संकटाची तीव्रता वाढताच अनेकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. त्यानंतर मात्र नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. त्यात मास्क वापरण्यासंबंधित अपुरी माहिती, गैरसमज नागरिकांच्या मनात होते. तर मागणी वाढल्यामुळे मास्कचा तुटवडा जाणवून लागला आणि त्यातून अनेक ठिकाणी काळाबाजारही झाला. दरम्यान मास्क घालणे गरजेचे आहे. त्यामुळे मास्क बनवण्याचे अनेक व्हिडिओज समोर आले. आता बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने देखील मास्क बनवण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. यासाठी विद्या बालन हिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने ब्लाऊज पीस आणि रबर बँडच्या साहाय्याने मास्क बनवण्याची पद्धत दाखवली आहे.

'आपला देश आपला मास्क' असे कॅप्शन तिने हा व्हिडिओ शेअर करताना दिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी विद्याचे आभार मानले आहेत. (घरगुती Reusable Face Cover, Cloth Mask वापरताना या खास टीप्स नक्की लक्षात ठेवा)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

#ApnaDeshApnaMask #HomeMadeMasks @apnamask @startupsvscovid P.S:Ek purani saree ko kar bahut saare masks ban sakte hain.

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

कोरोना विरुद्धच्या लढ्यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी सक्रीय सहभाग दर्शवला आहे. आर्थिक मदतीपासून गरीब गरजूंना अन्नदान करण्यात अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी आपले हॉटेल्स, ऑफिसेस विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी सरकारला देऊ केले आहेत. या सगळ्यासोबत घरी सुरक्षित राहण्याचेही आवाहनही सेलिब्रिटींकडून वारंवार करण्यात येत आहे.