Bollywood आणि Bhojpuri चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री Sripradha यांचे COVID-19 मुळे निधन

श्रीप्रदाने हिंदी, दक्षिण भारतीय आणि भोजपुरी अशा तब्बल 68 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय बर्‍याच टीव्ही शोमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

अभिनेत्री श्रीप्रदा (Photo Credits: Twitter)

Veteran Actress Sripradha Passes Away Due to COVID-19: बॉलिवूड, भोजपुरी आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री श्रीप्रदा (Sripradha) यांचे बुधवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 80 आणि 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार्‍या श्रीपादाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'आग के शोले', 'बेवफा सनम' ते झी टीव्हीच्या भयपट मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.

श्रीप्रदा यांनी 1989 सुपरस्टार धर्मेंद्र आणि दिवंगत विनोद खन्ना यांच्या 'बटवारा' मध्ये देखील काम केले होते. श्रीप्रदाने हिंदी, दक्षिण भारतीय आणि भोजपुरी अशा तब्बल 68 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय बर्‍याच टीव्ही शोमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. (वाचा - Chaudhary Ajit Singh Passes Away: RLD प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन)

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या (CINTAA) च्या अधिकृत ट्विटद्वारे अभिनेत्री श्रीप्रदाच्या कोविडमुळे झालेल्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. असोसिएशनने अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, CINTAA अभिनेत्री श्रीप्रदा यांच्या निधनाबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by CINTAA (@cintaaofficial)

अभिनेत्री श्रीप्रदा यांच्या निधनानंतर ई-टाईम्सशी बोलताना CINTAA चे सरचिटणीस अमित बहल यांनी दु: ख व्यक्त केले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने बॉलिवूडमधील अनेक मौल्यवान लोकांचा बळी घेतला आहे. श्रीपादांचे निघून जाणे आमच्यासाठी अत्यंत वाईट आहे. श्रीप्रदा यांचे हिंदी, दक्षिण भारतीय आणि भोजपुरी चित्रपटात मोठे नाव आहे.