Coolie No 1 Trailer: वरुण धवन आणि सारा अली खान यांचा कुली नंबर 1 चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आला समोर, हसून व्हाल लोटपोट

त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचविण्यासाठी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

Coolie No 1 Trailer (Photo Credits: YouTube)

गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा चित्रपट कुली नंबर 1 (Coolie No.1) चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. डेविड धवन (David Dhwan) दिग्दर्शित 90 च्या दशकात आलेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचा कुली नंबर 1 या चित्रपटाचा हा रिमेक (Coolie No.1 Remake) आहे. या रिमेकची वरुण आणि साराचे चाहते गेल्या प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षा करत होते. कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता हा चित्रपट OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित केला जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचविण्यासाठी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

या ट्रेलरमधून आपल्याला गोविंदाच्या कुली नंबर 1 चित्रपटाची झलक पाहायला मिळेल. यात वरुण आणि सारा सह परेश रावल, राजपाल यादव आणि चंकी पांडे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.हेदेखील वाचा- Kunal Khemu ने आपली पत्नी Soha Ali Khan च्या पाककलेबाबत सांगितला एक मजेदार किस्सा, ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल (Watch Video)

Watch Trailer

डेविड धवन दिग्दर्शित कुली नंबर 1 हा चित्रपट येत्या 25 डिसेंबरला अॅमेजॉन प्राईम (Amazon Prime) या OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होईल. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या या मूळ चित्रपटातील गोविंदा आणि करिश्माच्या जबरदस्त केमिस्ट्रीने हा चित्रपट सुपरहिट केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील भरघोस कमाई केली होती. तिच जादू वरुण आणि सारा पसरवण्यात यशस्वी ठरणार का हे येत्या 25 डिसेंबरला कळेलच.