Jani Chacko Uthup Dies at 78: गायिका Usha Uthup यांच्या पतीचं निधन; घरात टीव्ही पाहताना आला cardiac arrest चा तीव्र झटका

आज उषा उथ्थप यांच्या पतीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होणार आहेत.

उषा उथ्थप | Insta

भारताची पॉप आयकॉन Usha Uthup यांच्या पतीचं निधन झालं आहे. 78 वर्षीय Jani Chacko Uthup यांना घरात टीव्ही पाहताना हार्ट अटॅक आल्याने त्यांचं निधन झालं आहे. त्यांना तातडीने नजिकच्या हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. जानी यांचं निधन तीव्र कार्डियक अरेस्टने झालं असल्याचं हॉस्पिटल कडून सांगण्यात आले आहे. उषा आणि जानी यांनी एका मुलगा एक मुलगी आहे.

उषाचे दुसरे पती जानी हे चहाच्या मळ्याशी संबंधित व्यवसायामध्ये होते. 70 च्या दशकाच्या सुरुवातीस ते प्रतिष्ठित ट्रिनकास येथे पहिल्यांदा भेटले. उषाचा यापूर्वी दिवंगत रामूशी विवाह झाला होता. दरम्यान उषा यांना नुकतेच पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केले होते. आज उषा उथ्थप यांच्या पतीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होणार आहेत.

उषा उथ्थप या आपल्या वेगळ्या थाटणीच्या आवाजामुळे 90 च्या दशकात विशेष गाजल्या. 76 वर्षीय उषा यांच्या गायनाला करियर म्हणून सुरूवात ही चैन्नई च्य नाईटक्लब मधून झाली. अभिनेते देवानंद यांनी त्यांना दिल्लीच्या नाईट क्लब मध्ये हेरलं होतं. त्यानंतर 1971 च्या हरे रामा हरे कृष्णा या दिग्दर्शनातून त्यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif