रकुल प्रित सिंह हिने केली प्लास्टिक सर्जरी? फोटोपाहून युजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया
Rakul Preet Singh (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री रकुल प्रित सिंह (Rakul Preet Singh) हिचे साउथ इंडस्ट्रीमध्ये खुप मोठे नाव आहे. तर बॉलिवूड मध्ये सुद्धा तिने अजय देवगन आणि तब्बू यांचा 'दे दे प्या दे' सिनेमातून आपली एन्ट्री केली होती. रकुल प्रीत हिच्या सौंदर्यामुळे तिला खुप पसंद केले जाते. मात्र सध्या असे झाले की, तिला चक्क सोशल मीडियात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच फोटोंवर विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या जात आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी रकुल प्रित सिंह हिने सोशल मीडियात एक फोटो शेअर केला होता. त्यावरुन आता तिला विविध प्रश्न विचारले जात आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा बदललेला लूक पसंदीस पडलेला नाही. त्यांनी तिला प्लास्टिक सर्जरी केली आहे का असे प्रश्न विचारु लागले आहेत. यावरुन तिला आणखी ट्रोल करण्यास सुरुवात झाली.(Madhuri Dixit आणि Mouni Roy यांचा 'माए नि माए' गाण्यावर सुरेख डान्स Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल प्रित सिंह (Photo Credits-Instagram)

दरम्यान, रकुल प्रित यापूर्वी सुद्धा सोशल मीडियात ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आली होती. ईडीने एलएसडी आणि एमडीएमए सारख्या महागड्या अंमली पदार्थ पुरवण्यासंदर्भात तेलुगु फिल्म इंडस्ट्री मधील 10 जणांना समन्स धाडण्यात आले होते. त्यात रकुल हिच्या नावाचा समावेश होता.