Lockdown 5.0: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ने उचललं 80 किलो वजन; पहा व्हायरल व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या लॉकडाऊनचा पुरेपुर वापर करताना पाहायला मिळत आहे. आज उर्वशीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहतेदेखील आर्श्चचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला 80 किलो वजन उचलताना पाहायला मिळत आहे. उर्वशीचा हा वर्कआऊट पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

Lockdown 5.0: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ने उचललं 80 किलो वजन; पहा व्हायरल व्हिडिओ
उर्वशी रौतेला (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या लॉकडाऊनचा (Lockdown) पुरेपुर वापर करताना पाहायला मिळत आहे. आज उर्वशीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहतेदेखील आर्श्चचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला 80 किलो वजन उचलताना पाहायला मिळत आहे. उर्वशीचा हा वर्कआऊट पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

उर्वशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, '80 किलो (176.37 पाउंड्स) ग्ल्यूट थ्रस्ट हा शेवटचा सेट. पॉझिटिव्ह माइंडसेट. स्वतःसाठी सबब सांगणे थांबवा आणि आपल्या लक्ष्याकडे कृती करण्यास प्रारंभ करा. कोणीही आपल्यासाठी ते साध्य करणार नाही. आपण कठीण काळात धडपडल्यानंतर आपले सर्वोत्तम परिणाम घडतात. पुढे चलत रहा,' असं आवाहनही उर्वशीने आपल्या चाहत्यांना केलं आहे. (हेही वाचा - ‘हंड्रेड’ वेबसीरिजसाठी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार ने तयार केलं ‘चौकना...बच के रहेना' रॅप साँग; पहा व्हिडिओ)

दरम्यान, या व्हिडिओमध्ये उर्वशीने ब्लॅक स्पोर्ट्स वेअरमध्ये घाम गाळताना दिसत आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्वशी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. लॉकडाऊन काळात उर्वशी आपल्या चाहत्यांना फिटनेसचे धडे देत आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2020 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).