Urmila Matondkar चं Instagram Account रिस्टोर; मुंबई पोलिसांचे मानले आभार (See Post)
यासाठी तिने इंस्टा पोस्ट करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. मात्र तिच्या काही पोस्ट मिस झाल्याचेही तिने म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिचे हॅक झालेले इंस्टाग्राम अकाऊंट (Instagram Account) रिस्टोर झाले आहे. यासाठी तिने इंस्टा पोस्ट करत मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) आभार मानले आहेत. मात्र तिच्या काही पोस्ट मिस झाल्याचेही तिने म्हटले आहे. उर्मिलाचे इंस्टाग्राम अकाऊंट काल हॅक झाले होते. मुंबई पोलिसांनी तातडीने अॅक्शन घेतल्याने ते लवकर रिस्टोर झाले. याकरता तिने पोलिसांना धन्यवाद दिले आहेत. यासाठी केलेल्या पोस्टमध्ये उर्मिलाने लिहिले, "आणि मी परत आली आहे. काही पोस्ट मिसिंग असल्या तरी माझे अकाऊंट रिस्टोर करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल इंस्टाग्राम आणि मुंबई पोलिसांचे धन्यवाद. माझ्या इंस्टा फॅमेलीसाठी खूप प्रेम."
दरम्यान, इंस्टा अकाऊंट हॅक झाल्याची माहिती उर्मिलाने ट्विटच्या माध्यमातून दिली होती. "माझे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. सुरूवातीला ते तुम्हांला डीएम करतात. काही स्टेप्स फॉलो करण्याच्या सूचना देतात, त्यानंतर ते हॅक होतं. खरंच? नॉट डन," असे तिने ट्विटमध्ये म्हटले होते. (Urmila Matondkar यांचं Instagram Account झालं हॅक; ट्वीट करत माहिती)
पहा पोस्ट:
"सायबर गुन्हे स्त्रियांनी हलक्यात घेऊ नये. माझे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्यानंतर मी एफआयआर दाखल केली. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॉंचच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांना भेटले. त्यांनी मला या प्रकरणी अधिक माहिती दिली. तसंच यावर भविष्यात नक्कीच काम करणार आहे," असे उर्मिला मातोंडकर हिने बुधवारी सायंकाळी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस कडून निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.