IPL Auction 2025 Live

Upcoming Movies on OTT: बच्चन पांडे ते गंगूबाई काठियावाडी पर्यंत चित्रपटगृहातील 'हे' मोठे चित्रपट प्रदर्शित होणार OTT वर (See List)

या चित्रपटांमध्ये बच्चन पांडे, गंगूबाई काठियावाडी अशा मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे

Gangubai Kathiawadi (PC -Facebook)

कोरोना विषाणूच्या काळात चित्रपटगृहे बंद झाल्यानंतर निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मकडे (OTT Platform) वळले. ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. हेच कारण आहे की कोरोनाच्या काळापासून ओटीटीची लोकप्रियता देखील खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, चित्रपट निर्माते थिएटरसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट प्रदर्शित करत आहेत. अशात येत्या काही दिवसांत चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये बच्चन पांडे, गंगूबाई काठियावाडी अशा मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.

बच्चन पांडे (Bachchan Pandey) -

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट 18 मार्च रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही वेळाने Amazon Prime Video वर देखील प्रदर्शित होईल.

भीमला नायक (Bheemla Nayak) -

पवन कल्याण आणि राणा दग्गुबती स्टारर भीमला नायक 25 फेब्रुवारी रोजी थिएटर रिलीज झाल्यानंतर OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील पाहण्यासाठी उपलब्ध होईल.

गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) -

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यानंतर आता तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होईल.

आरआरआर (RRR) -

25 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला RRR हा चित्रपट दोन वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट Zee5 वर तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध असेल. तर Netflix वर हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, कोरियन, स्पॅनिश आणि तुर्की भाषांमध्ये प्रवाहित केला जाईल. (हेही वाचा: Attack New Poster: जॉन अब्राहम 'अटॅक'साठी सज्ज, 'या' दिवशी ट्रेलर होणार प्रदर्शित)

बधाई दो (Badhaai Do) -

बॉलीवूड स्टार राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा 'बधाई दो' हा चित्रपट 11 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर तो लवकरच Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.