Anupam Kher Office Robbery Case: अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यांचा दोन चोरट्यांना अटक
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी त्याच्या मुंबईतील अंधेरी येथील वीरा देसाई कार्यालयात प्रवेश करून रोख रक्कम आणि चित्रपटाच निगेटीव्ह वस्तू चोरल्या होत्या.
Anupam Kher Office Robbery Case: बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेता अनुपम खैर यांच्या कार्यालयात नुकतेच चोरी झाली होती. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी त्याच्या मुंबईतील अंधेरी येथील वीरा देसाई कार्यालयात प्रवेश करून रोख रक्कम आणि चित्रपटाच निगेटीव्ह वस्तू चोरल्या होत्या. अखेर पोलिसांनी चोरी करणाऱ्यांना दोन चोरट्यांचा मुसळ्या आवळल्या आहे. अनुपम खेर यांनी चोरी झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. (हेही वाचा- सहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख आणि मोहम्मद खान अशी चोरट्यांनी ओळख पटली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केले आहे. या प्रकरणी डीएननगर पोलिस ठाण्यात कारवाई सुरु केली आहे. 19 जून रोजी अंधेरी येथील कार्यालयात चोरी झाली होती. त्यानंतर चित्रपट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. चोरीची घटना घडल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर घटनेची माहिती दिली. सोशल मीडियावर ऑफिसमध्ये झालेल्या चोरीचा व्हिडिओ शेअर केला होता.
चोरांनी कार्यालयात प्रवेश करून तेथील चार लाख रुपयांची चोरी आणि चित्रपटांच्या निगेव्हिज चोरल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेतला. अनुपम खेर यांच्या आगामी मैने गांधी को नहीं मारा या चित्रपटाचे निगेटिव्ह चोरल्याची माहिती आहे.