Jug Jugg Jeeyo Trailer Out: वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या 'जुग जुग जियो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video
त्याचबरोबर नीतू कपूर आणि अनिल यांच्या भूमिकांनाही खूप पसंती दिली जात आहे. मनीष पॉलचे कॉमिक टायमिंगही जबरदस्त आहे. 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Jug Jugg Jeeyo Trailer Out: वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात कियारा आणि वरुण व्यतिरिक्त नीतू कपूर, अनिल कपूर, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे.
ट्रेलरमध्ये असे दिसते की, वरुण धवन आणि कियारा अडवाणी हे विवाहित जोडपे आहेत. परंतु, दोघेही एकत्र आनंदी नाहीत आणि आता त्यांना एकमेकांपासून घटस्फोट घ्यायचा आहे. त्याचवेळी अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor)यांनी वरुण धवनच्या पालकांची भूमिका साकारली आहे. 'जुग जुग जिओ' हा संपूर्ण मनोरंजन कौटुंबिक-नाटक चित्रपट आहे, हे ट्रेलरवरून स्पष्ट होते. (हेही वाचा - Pan Masala Ad: अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यावर गुन्हा दाखल; पान मसाला जाहिरातीमुळे वाढल्या अडचणी)
इथे पहा ट्रेलर -
'जुग जुग जिओ'च्या ट्रेलरमध्ये वरुण धवन आणि कियारा अडवाणीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नीतू कपूर आणि अनिल यांच्या भूमिकांनाही खूप पसंती दिली जात आहे. मनीष पॉलचे कॉमिक टायमिंगही जबरदस्त आहे. 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या प्रदर्शित होणार चित्रपट -
वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या 'जुग जुग जियो'मध्ये बिघडत चाललेल्या नात्याची कहाणी सांगण्यात आली आहे. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व जोहर यांनी संयुक्तपणे चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.