टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ हिने शेअर केले बॉयफ्रेंड सोबतचे रोमांटिक फोटोज; पहा Viral Pics

कृष्णाने बॉयफ्रेंडसह रोमांटिक फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो किसिंगचा आहे. तर एक स्विमिंगपूल मधील. इतर रोमांटिक फोटोज नक्कीच लक्षवेधी आहेत.

टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ हिने शेअर केले बॉयफ्रेंड सोबतचे रोमांटिक फोटोज; पहा Viral Pics
Krishna Shroff with boyfriend Eban Hyams (Photo Credits: Instagram)

सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोज, व्हिडिओजमुळे कायम चर्चेत राहणारी कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) पुन्हा एकदा जबरदस्त फोटोज घेऊन चाहत्यांच्या भेटीला आली आहे. टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहीण कृष्णा श्रॉफ हिने बॉयफ्रेंड Eban Hyams सह रोमांटिक फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज जूने असले तरी कृष्णाची ही नवी पोस्ट सोशल मीडियावर साऱ्यांचे लक्ष वेधत आहे. या फोटोत कृष्णा आपल्या बॉयफ्रेंडसह निसर्गरम्य ठिकाणी व्हेकेशनवर गेल्याचे कळते. मात्र या फोटोजमुळे कृष्णाच्या रिलेशनशीपच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

कृष्णाने हे फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो किसिंगचा आहे. तर एक स्विमिंगपूल मधील. इतर रोमांटिक फोटोजही नक्कीच लक्षवेधी आहेत. टाइगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ चा हॉट बिकीनी अवतार; सोशल मीडियात चर्चेत असलेल्या फोटोने चाहते दंग (See Pic)

कृष्णा श्रॉफ पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff) on

कृष्णाचे हे रोमांटिक फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कृष्णा आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये ताण निर्माण झाल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगत होत्या. मात्र या रोमांटिक पोस्टने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. Eban Hyams पाहताच त्याच्याकडे आकर्षित झाल्याचे कृष्णाने यापूर्वी सांगितले आहे. तसंच Eban खूप आकर्षक आणि तिला सुटेबल आहे. मी त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल असते, अशी कबुलही तिने दिली आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2020 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).