Anant-Radhika Engagement Party: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंडच्या साखरपुड्यानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत लावली 'या' बॉलिवूड स्टार्संनी हजेरी, Watch Video

अनंत आणि राधिका यांनी मोती महल येथे आपापल्या कुटुंबियांसोबत पार्टीचे आयोजन केले. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी या जोडप्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अँटिलिया येथे एक भव्य एंगेजमेंट पार्टी दिली. ज्यामध्ये अनेक बॉलीवूड तारे उपस्थित होते.

Anant-Radhika Engagement Photo (PC - Instagram/@pinkvilla)

Anant-Radhika Engagement Party: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याने गुरुवार, 29 डिसेंबर रोजी त्यांची दीर्घकाळाची मैत्रीण राधिका मर्चंट (Radhika Merchant) सोबत एंगेजमेंट केली. राजस्थानातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात या जोडप्याचा रोका सोहळा संपन्न झाला. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या कार्यक्रमानंतर अनंत आणि राधिका यांनी मोती महल येथे आपापल्या कुटुंबियांसोबत पार्टीचे आयोजन केले. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी या जोडप्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अँटिलिया येथे एक भव्य एंगेजमेंट पार्टी दिली. ज्यामध्ये अनेक बॉलीवूड तारे उपस्थित होते. पापाराझीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्हाला या पार्ट्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळतील. (हेही वाचा -Anant Ambani Radhika Merchant Engagement: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत झाला साखरपुडा; See Photos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सलमान खान -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खानने पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पार्टीत सलमानची एन्ट्री दमदार झाली. बऱ्याच दिवसांनी भाईजान फॉर्मल लूकमध्ये दिसला.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बी-टाऊनचे प्रेमी युगल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही या पार्टीला हजेरी लावली. त्यांनी एकत्र पार्टीत प्रवेश केला. आलिया मिंट ग्रीन शरारा सेटमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. दुसरीकडे, रणबीर काळ्या कुर्ता सेटमध्ये दिसला, जो त्याने मॅचिंग एम्ब्रॉयडरी जॅकेटसह परिधान केला होता.

रणवीर सिंग -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बॉलीवूडचा डेजिंग अभिनेता रणवीर सिंगनेही पार्टीला हजेरी लावली होती. मात्र अभिनेता एकटाच आला होता. तो नेहमीप्रमाणे त्याच्या उत्तम मूडमध्ये दिसत होता. त्याने पीकॉक ब्लू एम्ब्रॉयडरी केलेले मखमली जॅकेट परिधान केले होते. अभिनेत्याने स्टेटमेंट नेकलेस, काळी टोपी आणि टिंटेड चष्म्याच्या जोडीने त्याचा लूक पूर्ण केला.

जान्हवी कपूर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेत्री जान्हवी कपूर एका जबरदस्त लुकसह पार्टीमध्ये गेली. गुलाबी ओम्ब्रे ऑर्गेन्झा साडीमध्ये ती गॉर्जियस दिसत होती. या साडीवर जान्हवीने गुलाबी नक्षीदार ब्लाउज घातले होते. मिली अभिनेत्रीचे चाहते आणि फॉलोअर्स आता तिच्या साध्या आणि मोहक लूकची प्रशंसा करताना दिसत आहेत.

झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

प्रसिद्ध क्रिकेटर आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या एंगेजमेंट पार्टीला स्टाईलमध्ये हजर होते. सागरिका घाटगे बेज एम्ब्रॉयडरी केलेल्या लांब कुर्त्यामध्ये सुंदर दिसत होती. तर झहीर खान निळ्या रंगाच्या कुर्ता आणि जॅकेटमध्ये देखणा दिसत होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now