Filmfare Awards 2021: दिवंगत अभिनेता इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर तापसी पन्नूच्या 'थप्पड' ने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार; पहा फिल्मफेअर अवॉर्ड्सची संपूर्ण यादी

इरफान खान यांना 66 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

Filmfare Awards 2021 (PC - Twitter)

Filmfare Awards 2021: हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक लोकप्रिय फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) जाहीर झाला आहे. हा 66 वा फिल्मफेअर पुरस्कार आहे. कोरोना साथीमुळे 2020 हे वर्ष भारतीय सिनेमासाठी खूप कठीण होते. त्याचा परिणाम फिल्मफेअर अवॉर्ड्सवरही दिसून आला आहे. दरवर्षीप्रमाणे, 66 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्येही अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला आणि पुरस्कार जिंकले. तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) थप्पड चित्रपटाने फिल्मफेअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांना देण्यात आला आहे. इंग्लिश मीडियम या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. एवढेचं नव्हे तर इरफान खान यांना 66 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारानेही (Life Time Achievement Award) गौरविण्यात आले आहे. (वाचा - Malaika Arora च्या 'मुन्नी बदनाम हुई' आयटम साँगचा इंग्लडच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश; अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली माहिती)

फिल्मफेअर पुरस्काराची संपूर्ण यादी -

दरम्यान, फिल्मफेअर पुरस्कार हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. 1954 सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात.