Arya Banerjee Dies at 35: 'द 'डर्टी पिक्चर' अभिनेत्री आर्या बॅनर्जी चा कोलकत्त्याच्या घरी आढळला मृतदेह

आर्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असून तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

विद्या बालन, आर्या बनर्जी (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री आर्या बॅनर्जी (Arya Banerjee) हीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बॉलिवूड मध्ये डर्टी पिक्चर, लव सेक्स अ‍ॅन्ड धोका या सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकलेल्या आर्याचा तिच्याच घरी मृतदेह आढळला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, 35 वर्षीय आर्याचा मृत्यू शुक्रवारी झाला असून पोलिस तिच्या घरात शिरले तेव्हा तिचा मृतदेहावर रक्त होते. अभिनेत्री Shikha Malhotra हिला पॅरालिसिस चा झटका; जुहू येथील कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु.

आर्या बॅनर्जीचं मूळ नाव देवदत्त बॅनर्जी आहे. ती प्रसिद्ध दिवंगत सीतार वादक निखिल बॅनर्जी यांची लेक आहे. फॉरन्सिक एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, आर्याच्या नाकाजवळ रक्त होते. तसेच तिने उलट्या देखील केल्या होत्या. सध्या तिचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्स मध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये, आर्याच्या घरी काम करणारी महिला आली तेव्हा तिने बराच वेळ दरवाजा ठोठावला तरीही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यावेळेस शेजार्‍यांना सांगून पोलिसांना बोलावण्यात आले. नंतर त्यांनी दरवाजा उघडला. आणि सारा प्रकार समोर आला.

आर्या कोलकत्ता मध्ये एकटीच राहत होती. तिची बहीण सिंगापूरमध्ये राहते. दरम्यान अजूनही आर्याच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही. त्याचा अधिक तपास सुरू आहे. आर्याने मॉडलिंग क्षेत्रामध्ये मध्ये करियर केले असले तरीही अभिनयापूर्वी तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. आर्याने शास्त्रीय संगीतामध्ये पद्व्युत्तर पदवी घेतली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif