The Battle Of Bhima Koregaon Poster: अभिनेता अर्जुन रामपाल याचा आगामी चित्रपट 'द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव' चे पोस्टर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने त्याचा आगामी चित्रपट 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट केले आहे.

The Battle Of Bhima Koregaon Poster: अभिनेता अर्जुन रामपाल याचा आगामी चित्रपट 'द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव' चे पोस्टर प्रदर्शित
The Battle Of Bhima Koregaon (Photo Credits-Instagram)

The Battle Of Bhima Koregaon Poster Released: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने त्याचा आगामी चित्रपट 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट केले आहे. हा ऐतिहासिक चित्रपट पुढील वर्षात म्हणजेच 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर अर्जुन याची वाढलेली दाढी, लांब केसामधील लूक हा एका योद्धासारखा दिसून येत आहे. या चित्रपटात दिगंगना सूर्यवंशी, अभिमन्यू सिंह आणि सनी लिओनी सुद्धा दिसून येणार आहे.(Adipurush: सैफ अली खान याचा चित्रपट 'आदिपुरुष' प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात; कारण घ्या जाणून)

अर्जुन रामपाल याने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर झळकवले आहे. या पोस्टरचा कॅप्शन देत त्याने असे म्हटले आहे की, ''Proud to be part of this film. A film with a strong message. A part of history revisited.'' तसेच अर्जुन याने #TheBattleofBhimaKoregaon येत्या 2021 मध्ये येणार आहे असे म्हटले आहे.(Ram Setu: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर अक्षय कुमार सिनेमाच्या शूटींगसाठी अयोध्येत जाणार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

या चित्रपटाची कथा 1 जानेवारी 1818 मध्ये भिमा कोरोगाव येथे झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठ्यांमध्ये झालेल्या वादग्रस्त लढाईवर आधारित आहे. ब्रिटिशांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात महार सैनिकांचा समावेश होता. त्यांनी बऱ्याच बलाढ्य अशा सैन्याला मागे टाकले होते. या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला होता. मात्र या विजयामुळे महार समाजातील लोकांनी आनंद व्यक्त केला होता. कारण त्या काळात महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानले जाते. या दोघांमधील युद्धा कोरोगावची लढाई म्हणून ओळखले जाते.

(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2020 05:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).