Thalaivii च्या साऊथ व्हर्जनला मल्टीप्लेक्स मालकांचा हिरवा कंदील; आनंदात Kangana Ranaut ची पोस्ट
त्यानंतर आता थलाइवीचे साऊथ व्हर्जन मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यास मालकांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) चा सिनेमा थलायवी (Thalaivii) प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषांमध्ये असलेला हा सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये रिलीज होण्यास काही अडथळे येत होते. त्यानंतर कंगनाने एक व्हिडिओ बनवत सर्व मल्टीप्लेक्स मालकांना सिनेमा रिलीज करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता थलायवीचे साऊथ व्हर्जन मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यास मालकांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे कंगना अत्यंत आनंदीत झाली असून तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कंगना रनौतने पोस्टमध्ये लिहिले की, "थलायवीचे साऊथ व्हर्जन मल्टीप्लेक्समध्ये रिलीज करण्याची परवानगी मिळाली आहे. ती सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की त्यांनी सिनेमागृहात जावून हा सिनेमा पाहावा. मी आणि माझी टीम थलायवीसाठी वापरण्यात आलेल्या दयाळू शब्दाने प्रभावित झालो आहोत. हिंदी व्हर्जनसाठी देखील आम्हाला हे समाधान मिळेल. ज्यामुळे हिंदी व्हर्जनला देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळू शकेल." (Kangana Ranaut हिच्या थलाइवी सिनेमाच्या विरोधात कटकारस्थान रचले जातेय? अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करत दिले स्पष्टीकरण)
पहा पोस्ट:
दरम्यान, यापूर्वी कंगना रनौतने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती म्हणाली होती की, "कठीण काळात आपण एकमेकांना साथ देणे गरजेचे आहे. ही वेळ तोंड फिरवण्याची नाही. थलायवी सिनेमासाठी 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा सिनेमा स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज न करता सिनेमागृहात रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. कारण यातून आम्हाला आमची ओळख मिळाली आहे. त्यामुळे आता आपल्याला एकमेकांना साथ द्यायची आहे. परंतु, मल्टीप्लेसची परवानगी मिळत नाही." अशावेळी तिने मल्टीप्लेस मालकांना सिनेमा प्रदर्शित करण्याची विनंती केली होती.