Mollywood Controversy: कास्टिंग डायरेक्टर Tess Joseph यांच्याकडून अभिनेता Mukesh यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप; मॉलिवडमध्ये खळबळ

त्यांनी दावा केला आहे की, अभिनेत्याने शूटिंग दरम्यान तिला त्याच्या हॉटेल रूममध्ये वारंवार बोलावले होते. कास्टिंग डायरेक्टरने या आधी 2018 मध्येही अशाच प्रकारचे आरोप या अभिनेत्यावर केले होते.

Tess Joseph-Mukesh-Controversy | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कास्टिंग डायरेक्टर टेस जोसेफ (Tess Joseph) यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मुकेश (Mukesh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, अभिनेत्याने शूटिंग दरम्यान तिला त्याच्या हॉटेल रूममध्ये वारंवार बोलावले होते. कास्टिंग डायरेक्टरने या आधी 2018 मध्येही अशाच प्रकारचे आरोप या अभिनेत्यावर केले होते. आता पुन्हा एकदा तसेच आरोप झाल्याने हा अभिनेता चर्चेत आला आहे. दरम्यान, हेमा समितीच्या अहवालाच्या (Hema Committee Report) प्रकाशनामुळे मल्याळम चित्रपट (Malayalam Film Industry) उद्योगात, प्रामुख्याने मॉलीवूड (Mollywood Controversy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रात वाद निर्माण झाला आहे.

रेवती संपत, श्रीलेखा मित्रा यांच्याकडूनही गंभीर आरोप

मल्याळी चित्रपटसृष्टी लैंगिक छळांच्या आरोपांमुळे पाठीमागील काही दिवसांपासून ढवळून निघाली आहे. तरुण अभिनेत्री रेवती संपत यांनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर अभिनेता सिद्दीकी यांनी आज सकाळी AMMA सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दिग्दर्शक रंजित यांनीही बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा (Sreelekha Mitra) हिच्याकडून लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर फिल्म अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बंगाली अभिनेत्रीने खुलासा केला की रंजित दिग्दर्शित 'पलेरीमानिक्यम' या चित्रपटात काम करताना तिला वाईट अनुभव आला. श्रीलेखा मित्रा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, रुममध्ये बोलावल्यानंतर त्यांच्या हातावर आणि मनगटावर आणि नंतर मानेवर हल्ला करण्यात आला. त्यांचे केस ओढून त्यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर टेस जोसेफ यांनी केलेल्या आरोपानंतर अभिनेते मुकेश चर्चेत आणि वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. (हेही वाचा, Malayalam Actress Sexual Assault Case: मल्याळम मुव्ही आर्टिस्टचे सरचिटणीस Siddiqui यांच्यावर गंभीर आरोप, मानसिक आणि शारिरिक अत्याचार केल्याचे अभिनेत्रीची तक्रार)

अभिनेता मुकेश यांनी फेटाळले आरोप

अभिनेता मुकेश हे केवळ अभिनेतेच नाहीत तर, ते विधानसभेचे सदस्य (आमदार) देखील आहेत. जोसेफ यांच्याकडून झालेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. तथापि, मल्याळम चित्रपट उद्योगातील विविध समस्यांचा पर्दाफाश करणारा हेमा समितीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाल्याने जोसेफने यांनी त्यांच्या दाव्यांचा पुनरुच्चार केला आहे. हेमा समितीच्या अहवालामुळे आधीच मॉलीवुडमध्ये लक्षणीय परिणाम झाला आहे. उद्योगातील नेत्यांना प्रचंड दबावाचा सामना करावा लागला आहे. वाद वाढत असताना, उद्योग आणि जनता या प्रकरणात पुढील घडामोडींची प्रतीक्षा करत आहे.

टीस जोसेफ यांनी एक्स पोस्ट

दरम्यान, अशाच प्रकारे आरोपांचा सामना करणाऱ्या सिद्दिकी यांनी आपण सरचिटणीस पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती दिली. त्यांनी राजीनाम्याचे पत्र AMMA अध्यक्ष मोहनलाल यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, माझ्यावरील आरोप तुमच्या लक्षात आले असतील, या स्थितीत मी तुम्हाला कळवू इच्छितो की, मी स्वेच्छेने संघटनेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे,’ असे राजीनामा पत्रात म्हटले आहे. तरुण अभिनेत्री रेवती संपतने सिद्दीकीवर लैंगिक आरोप केले होते.