Thappad Full Movie in HD Leaked on TamilRockers for Free Download: तापसी पन्नू च्या सिनेमाला पायरसीची 'थप्पड'; तामिळरॉकर्स वेबसाईटमुळे बसू शकतो मोठा फटका
तापसी पन्नु हिचा थप्पड सिनेमा प्रदर्शनाच्या सोबतच तामिळ रॉकर्स या वेबसाईटच्या पायरसीची शिकार ठरला आहे. टेलिग्राम वर सुद्धा हा सिनेमा लीक झाला आहे, साहजिकच यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता पर्यंत थप्पड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 14.66 कोटींची कमाई केली आहे.
अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) हिचा नवा कोरा सिनेमा थप्पड (Thappad) बॉक्स ऑफिस वर प्रदर्शित झाल्यापासून समीक्षक व चाहत्यांच्या पसंतीस उतरत चालली आहे, सिनेमाला मिळणारे चांगले रिव्ह्यू पाहता अनेकांना चित्रपट पाहण्याची इच्छा होतेय असंही दिसून येतंय. वास्तविक अशी इच्छा ही सिनेमाच्या बिझनेससाठी नक्कीच फायद्याची आहे असे तुम्ही म्हणाल. मात्र दुर्दैवाची बाब अशी कि यातील अनेक जण हे विना पैसे खर्च करता हा सिनेमा अन्य कुठे उपलब्ध होतोय जा याच्या शोधात आहेत, आणि अशा व्यक्तींसाठी तामिळ रॉकर्स (Tamil Rockers) सारख्या कुख्यात पायरसी साईटचा पर्याय फ्री टू डाउनलोड सिनेमा उपलब्ध करून देत आहे. तापसीचा थप्पड सिनेमा सुद्धा प्रदर्शनाच्या सोबतच या वेबसाईटच्या पायरसीची शिकार ठरला आहे. याशिवाय टेलिग्राम वर सुद्धा हा सिनेमा लीक झाला आहे, साहजिकच यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता पर्यंत थप्पड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 14.66 कोटींची कमाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी तापसीच्या थप्पड सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, त्यावरूनच हा सिनेमा जबरदस्त असणार याचा अंदाज येत होता, यामध्ये तापसी आणि तिचा नवरा हे आनंदी जोडपं दाखवलं आहे. मात्र त्यांच्या आयुष्यात एक क्षण येतो जेथे तिचा पती तिच्यावर हात उचलतो. या एका थप्पड वरून घरगुती हिंसेसारख्या मोठ्या मुद्द्याला या सिनेमाने हात घातला आहे.
पहा थप्पडची झलक
दरम्यान, तापसीने यापूर्वी सुद्धा अनेक सिनेमांमधून सामाजिक विषयांवर भाष्य केले आहे, यामध्ये खास गोष्ट अशी कि समाजदर्शन घडवणारे असूनही तापसीचे चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुद्धा होत असतात. या सिनेमात सुद्धा असाच खोल विषय आणि त्याला बॉलिवूड टच देऊन बनवण्यात आले आहे. अनुभव सिन्हा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे
(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2020 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

