‘तान्हाजी’ चित्रपट आता मराठीतही; पाहा अजय देवगण यांनी का मानले 'मनसे' चे आभार
'तान्हाजी : द नसंग वॉरियर’ हा हिंदी भाषेतील ऍक्शनपट मात्र जगभरातील अनेक भाषांमध्ये डब व्हावा अशी इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षाने याआधी अनेकदा हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करण्यावर आक्षेप घेतला आहे. परंतु 'तान्हाजी : द नसंग वॉरियर’ हा हिंदी भाषेतील ऍक्शनपट मात्र जगभरातील अनेक भाषांमध्ये डब व्हावा अशी इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने व्यक्त केली आहे. यासंदर्भातील माहिती मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. याच ट्विटला उत्तर देत अजय देवगण यांनी मनसेचे आभार मागितले आहेत व हा चित्रपट हिंदीसोबतच मराठीत डब करून प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अजय यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर लिहिलं आहे की, “हिंदी व मराठी भाषेत आमचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल अमेय आणि मनसेचे मी आभार मानतो. शूरवीर मराठा योद्धाची यशोगाथा त्यांच्या मातृभाषेत त्याचसोबत राष्ट्रीय भाषेत प्रेक्षकांना दाखवणे हा आमचा सन्मान आहे.”
पहा त्यांचं ट्विट,
मनसेने या चित्रपटाला मराठीत डब करण्यासाठी होकार देण्यामागचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा पराक्रमी मावळा तान्हाजी यांच्या शौर्याची गाथा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा.
दरम्यान, इतिहासावर आधारित असणाऱ्या या नव्या ऍक्शनपटाचं दिग्दर्शन केलं आहे ओम राऊत यांनी. अजय देवगण या सिनेमात तान्हाजी ही प्रमुख भूमिका साकारणार आहेत तर काजोल या तान्हाजी यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारताना दिसतील.