Tandav Controversy: तांडव वेब सिरीजबाबत उफाळला वाद; माहिती व प्रसारण मंत्रालयाने भारतातील अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ अधिका-यांना बजावला Summons
या मालिकेचे निर्माते आणि कलाकारांविरूद्ध लवकरच गुन्हा दाखल केला जाईल असेही ते म्हणाले. या विषयावर त्यांनी माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रही लिहिले. ज्यामध्ये या सिरीजवर कारवाई करण्याचे म्हटले होते.
नुकतेच रिलीज झालेली सैफ अली खानची वेब सिरीज 'तांडव' (Tandav) बाबत गदारोळ माजला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये भगवान राम, नारद आणि शिव यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर या सिरीजवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. हीच मागणी अनेक संघटना व भाजप नेते करीत आहेत. आता माहिती प्रसारण मंत्रालयाने (I&B Ministry) अॅमेझॉनकडून ‘तांडव’ वेब सिरीजसंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे. मंत्रालयाने अॅमेझॉन प्राइमला (Amazon Prime Video) सोमवारी 'तांडव'च्या कंटेंटबद्दल उत्तर देण्यास सांगितले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, 'तांडव' वेब सीरिजच्या वादाच्या संदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाने भारतातील अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ अधिका-यांना चौकशीसाठी बोलावले आहे. अभिनेता सैफ अली खान, डिंपल कपाडिया आणि अली झीशान अयूब स्टारर वेब सिरीज 'तांडव' शुक्रवारी रिलीज झाली आहे. प्रदर्शनानंतर या सिरीजमधील काही सिन्सवर आक्षेप नोंदवला जात आहे. सोशल मीडियावरील एका गटाने 'तांडव'विरूद्ध नकारात्मक वातावरण निर्माण करण्यास सुरवात केली आहे. या मालिकेत झीशान अयूबने हिंदू देवतांचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे #BoycottTandav ट्रेंड झाला होता. (हेही वाचा: 'तांडव' वेब सिरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांची घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार)
Amazon Prime Video officials in India summoned by the Information & Broadcasting Ministry, in connection with the controversy around web series 'Tandav'
या सिरीजच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी म्हटले आहे. या मालिकेचे निर्माते आणि कलाकारांविरूद्ध लवकरच गुन्हा दाखल केला जाईल असेही ते म्हणाले. या विषयावर त्यांनी माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रही लिहिले. ज्यामध्ये या सिरीजवर कारवाई करण्याचे म्हटले होते.