Actor Arulmani Passed Away: तामिळ अभिनेता, राजकारणी अरुलमणी यांचे चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गेल्या दहा दिवसांपासून अण्णाद्रमुकच्या वतीने तामिळनाडूच्या विविध भागांत दौरे करत होते. काही दिवसांची सुट्टी घेऊन ते गुरुवारीच चेन्नईला परतले.
Actor Arulmani Passed Away: 'सिंघम', 'लिंगा', 'अझगी' आणि 'थंडवकोन' यासारख्या लोकप्रिय दक्षिण चित्रपटांमध्ये दिसलेले प्रसिद्ध तमिळ अभिनेते आणि राजकारणी अरुलमणी (Arulmani) यांचे गुरुवारी वयाच्या 65 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते गेल्या काही दिवसांपासून AIADMK या राजकीय पक्षाचा प्रचार करत होते. अरुलमणी हे काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर असून राजकारणात सक्रिय होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गेल्या दहा दिवसांपासून अण्णाद्रमुकच्या वतीने तामिळनाडूच्या विविध भागांत दौरे करत होते. काही दिवसांची सुट्टी घेऊन ते गुरुवारीच चेन्नईला परतले.
चेन्नईला परतल्यानंतर अरुलमणी यांची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना जवळच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना रूग्णालयात नेण्यास विलंब झाला. रुग्णालयात तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली आहे. (हेही वाचा - Dhanush-Aishwarya Rajinikanth Divorce: लग्नाच्या 18 वर्षांनंतर वेगळे होणार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत; घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज)
अरुलमणी यांनी अड्यार फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी सुरिया आणि रजनीकांत यांसारख्या अभिनेत्यांसोबत सिंगम 2, सामानियान, स्लीपलेस आईज, थेंद्रल आणि थंडावकोन या तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय केला. अरुलमणी यांनी अनेक गरीब आणि गरजू लोकांना मदत केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
दोन आठवड्यात 4 कलाकारांचा मृत्यू -
या वर्षी तमिळ चित्रपटसृष्टीतून अनेक वाईट बातम्या समोर आल्या आहेत. अरुलमणीपूर्वी 26 मार्च रोजी कॉमेडियन शेषू यांचे वयाच्या 60 व्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. त्यांच्यानंतर डॅनियल बालाजी यांचा 29 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तसेच 2 एप्रिल रोजी विश्वेश्वर राव यांचे वयाच्या 64 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.