Taimur Khan आणि Inaya Khemu यांचा घरातच रंगला धूलिवंदनाचा खेळ, Watch Cute Photos
Taimur and Inaya Khemu Holi Celebration (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी यंदा एकत्रितरित्या एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करण्यावर सरकारने निर्बंध घातले. त्यामुळे अनेकांनी घरात राहूनचा रंगपंचमीचा आनंद लुटला. यात सामान्य लोकांपासून सेलिब्रिटीस त्याचबरोबर स्टारकिड्सचाही समावेश आहे. करीना आणि सोहा अली खानने आपली मुले घरातच रंगपंचमी खेळत असल्याचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये करीनाचा मुलगा तैमुर अली खान (Taimur Ali Khan) आणि सोहा अली खानची (Inaya Ali Khan) मुलगी इनाया खेमू एकत्र घरातील गार्डन परिसरात रंगपंचमीचा आनंद घेताना दिसली.

या फोटोमध्ये तैमूरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि तो फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तैमूरचा हा फोटो शेअर करत करीनाने ‘सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा… सर्वांनी काळजी घ्या, निरोगी रहा’ असे म्हटले आहे.हेदेखील वाचा- Holi 2021: मिताली-सिद्धार्थ चांदेकर, मानसी नाईकसह नुकत्याच लग्न झालेल्या अनेक मराठी सेलिब्रिटींनी साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी, Watch Photos

तर दुसरीकडे सोहा अली खानने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला तैमूर आणि इनायाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही घरात पूलमध्ये बसले असून होळी खेळताना दिसत आहेत.

Taimur and Inaya Khemu (Photo Credits: Instagram)

दरम्यान इनायाने राखाडी रंगाचा टॉप परिधान केला आहे. ते दोघे एकमेंकांना रंग लावताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Taimur and Inaya Khemu Holi Celebration (Photo Credits: Instagram)

त्यांचा या फोटोज आणि व्हिडिओ त्यांचे चाहते तसे मित्रपरिवार भरभरून कमेंट देत आहे. हे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.