Taarak Mehta Ka Ooltah Chashmah कार्यक्रमाचे निर्माते Asit Modi यांच्यावर गुन्हा दाखल, लैंगिक अत्याचाराचा आरोप
तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी (Asit Modi), प्रकल्प प्रमुख सोहिल रमाणी (Sohail Ramani) आणि जतीन बजाज (Jatin Bajaj) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी (Asit Modi), प्रकल्प प्रमुख सोहिल रमाणी (Sohail Ramani) आणि जतीन बजाज (Jatin Bajaj) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांवरही पवई पोलीस (Powai Police) स्थानकात लैंगिक छळ आणि बलात्काराच्या आरोपाखाली दाखल झालेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. हा एक कॉमेडी शो असून त्यातील कलाकार त्यांच्या अभिनयामुळे घरोघरी ओळखले जातात. या काळात हा शो चर्चेत असला तरी सततच्या वादामुळे तो चर्चेत आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा कार्यक्रमातील अनेक कलाकारांकडून तातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्यातूनच आता थेट पोलीस तक्रार झाल्याने कार्यक्रमाचे प्रमुख अलेल्या या तिघांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पवई पोलिसांनी निर्माते असित मोदी, प्रकल्प प्रमुख सोहिल रमाणी आणि जतीन बजाज यांच्या विरुद्ध भादंवि कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (हेही वाचा, Munmun Dutta in Kashmir: TMKOC ची मुनमुन दत्ता काश्मीरमध्ये आईसोबत लुटत आहे सुट्यांचा आनंद, पाहा फोटो)
ट्विट
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन सिटकॉम आहे जो सोनी सब चॅनेलवर प्रसारित केला जातो. हे स्तंभलेखक आणि नाटककार तारक मेहता यांनी लिहिलेल्या "दुनिया ने उंधा चष्मा" या साप्ताहिक स्तंभावर आधारित आहे. हा शो 28 जुलै 2008 रोजी प्रीमियर झाला आणि अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
सिटकॉम मुंबईतील काल्पनिक गृहनिर्माण संस्था गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशांच्या जीवनाभोवती फिरते. मुख्य पात्रांमध्ये जेठालाल गडा, त्यांची पत्नी दया आणि त्यांचा मुलगा टिपेंद्र (टपू) यांचा समावेश आहे, जे त्यांच्या विस्तारित कुटुंबासह राहतात. हा शो गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशांना सामोरे जाणाऱ्या विनोदी परिस्थिती, दैनंदिन संघर्ष आणि सामाजिक समस्यांवर केंद्रित आहे.
सिटकॉम त्याच्या हलक्याफुलक्या कॉमेडी, कौटुंबिक मूल्ये आणि सामाजिक संदेशांसाठी ओळखले जाते. याने गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे आणि तो भारतातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या दूरदर्शन कार्यक्रमांपैकी एक बनला आहे. या शोमध्ये मोठ्या संख्येने कलाकार आहेत आणि प्रत्येक पात्राचे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यामुळे मालिकेतील विनोद आणि आकर्षण वाढले आहे.