Gurucharan Singh Missing: 'तारक मेहता...'फेम अभिनेते गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले

तसंच त्याचा फोनही बंद येत असून 24 एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. गु

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम सोढी म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं असून आता हे अपहरणाचं प्रकरण असू शकतं असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांच्या हाती पालम परिसरातील परशुराम चौकातील सीसीटीव्ही फुटेज लागलं असून रात्री 9:14 वाजता गुरुचरण बॅग घेऊन त्या रस्त्याने जात असलेला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.  आता पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास हा करत आहे.  (हेही वाचा - TMKOC Actor Gurucharan Singh Missing: अभिनेता गुरुचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता, वडिलांकडून तक्रार दाखल; 'तारक मेहता...' मध्ये साकारली होती रोशनसिंग सोढीची भूमिका)

गुरुचरणने गेल्या काही काळात अनेक आर्थिक व्यवहार केले असून याबाबतची माहिती जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तसंच त्याचा फोनही बंद येत असून 24 एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. गुरुचरण काही कामानिमित्त मुंबईला जाणार होता. त्याने याबाबत त्याच्या मित्रांना कळवलं होतं. 22 एप्रिलला सकाळी तो घरातून फ्लाईट पकडण्यासाठी निघाला. रात्री साडेआठ वाजता त्याची फ्लाईट होती पण तो विमानात बसलाच नाही हे आता पोलीस तपासातून पुढे आले आहे.

गुरुचरण यांच्या आई -वडिलांचं वय जास्त असून ते गेल्या बराच काळापासून आजारी असतात. गुरुचरणची आई खूप आजारी असतात, त्या रुग्णालयात दाखल होत्या, पण आता ठीक आहे. पण अचानक तो बेपत्ता झाल्याने घरचे चिंतेत आहेत. 2020 मध्ये आई-वडिलांची सेवा करण्यासाठी गुरुचरण यांनी 'तारक मेहता...' शो ला रामराम केला.  अभिनेते गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर त्याचे पुर्वीचे सहकलाकार आणि चाहते देखील चिंतेत असून तो लवकरात लवकर साापडावा यासाठी प्रार्थना करत आहे.