अभिनेत्री सुश्मिता सेन हिने COVID-19 विरोधात लढण्यासाठी सांगितले 100% गुणकारी ठरणारे औषध

त्यासोबतच आता अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिने कोरोनावर मात करण्यासाठी एक रामबाण औषधच सांगितले आहे. असे ज्याने कोरोना आपल्या देशातून पळून जाऊ शकतो.

Sushmita Sen (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध लढण्यासाठी संपूर्ण देश सज्ज असून अगदी लहानग्यांपासून ते मोठ्या पर्यंत, तसेच सर्व राजकीय नेते, सिने कलाकार सोशल मिडियाच्या माध्यमातून घरात राहण्याचे नागरिकांना आवाहन करत आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर 21 दिवस घरात राहणे हा एकमेव उपाय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले होते. त्याचबरोबर अक्षय कुमार, ऋतिक रोशन, कैतरिना कैफ, दीपिका पादुकोण यांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेला घरी राहण्याचा सल्ला दिला होता. त्यासोबतच आता अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिने कोरोनावर मात करण्यासाठी एक रामबाण औषधच सांगितले आहे. असे ज्याने कोरोना आपल्या देशातून पळून जाऊ शकतो.

या औषधाचे नाव आहे 'Stay Home'. म्हणजे हा आजार होऊन जीवाशी खेळण्यापेक्षा घरात राहणे हे याच्यावर 100% परिणामकारक ठरेल असे औषध आहे.

पाहा सुश्मिता सेन ची पोस्ट:

 

View this post on Instagram

 

#important 🙏 while we are home, please don’t self medicate without checking with a doctor. The following information is for you & your families to be aware...do check with your doctors before taking my word for it!!🙏🤗 “Just got this from Cornell: FYI: Information from Vienna’s laboratory studying COVID-19 say vast majority of people who died had ibuprofen in their system so do not take it!! Those who recovered did not take ibuprofen so if you have symptoms, take Paracetamol only!!! Looks like this virus thrives on ibuprofen so don’t do it and tell everyone you can!!! There are a few articles online No Ibuprofens or any NSAIDS (Non steroidal anti inflammatory drugs) #stayhome #avoidselfmedication #checkwithdoctorfirst 👍❤️ I love you guys!!

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

हेदेखील वाचा- Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी ऋतिक रोशन, कपिल शर्मासह कलाकार मंडळी पुढे सरसावली

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सुष्मितानं महत्त्वाची माहिती देणारं कॅप्शन देखील लिहिलं आहे. 'घरात आहात म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या किंवा औषध घेऊ नका',असं तिनं म्हटलं आहे.

ऋतिकनेही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. तसंच विनाकारण बाहेर पडू नका असेही त्याने सांगितले. या व्हिडिओतून ऋतिकने खास लहानग्यांना संदेश दिला आहे. प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांकडे त्याने मदत मागितली आहे. ऋतिक म्हणाला की, मला ठाऊक आहे घरातील काही मोठी माणसे काही गोष्टी ऐकत नाहीत. पण तुम्ही त्यांना समजवा. घर आणि कुटुंबाच्या काळजीने ते घराबाहेर पडणार नाहीत. या परिस्थितीत घराबाहेर पडणे यात कोणतीही बहादुरी नसल्याचेही त्याने सांगितले