Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या निधनामुळे क्रीडाविश्वालाही जबर धक्का; विरेंद्र सेहवाग, सायना नेहवाल, शिखर धवन यांच्यासह क्रीडापटूंनी व्यक्त केल्या भावना
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या या धक्कादायक बातमीनंतर सोशल मीडियावर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आज वांद्रे (Bandra) येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या या धक्कादायक बातमीनंतर सोशल मीडियावर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. अद्याप सुशांत सिंहने टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 'छिछोरे' हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेतून प्रसिद्धीस आलेला सुशांत सिंह राजपूत याने मेहनतीने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिक मधील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. परंतु, सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या बातमीनंतर चाहत्यांसह सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक झालेल्या निधनावर क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), सायना नेहवाल (Saina Nehwal), शिखर धवन (Shikhar Dhawan), हर्षा भोगले (Harsha Bhogle), मोहम्मद कैफ (Mohammad Kaif), इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना)
विरेंद्र सेहवाग:
सायना नेहवाल:
शिखर धवन:
हर्षा भोगले:
इरफान पठाण:
मोहम्मद कैफ:
विराट कोहली:
सचिन तेंडुलकर:
अजिंक्य रहाणे:
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूत डिप्रेशनमध्ये होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. त्यानंतरच आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी आशा आहे.