Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना

सर्वांनीच या बातमीने आपल्याला धक्का बसल्याचे म्हणत सोबतच सुशांत याच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

Sushant Singh Rajput Death: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आपल्या वांद्रयाच्या (Bandra) राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर येताच बॉलिवूड सहित सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मानसिक नैराश्यातून सुशांत याने हे पाऊल उचलल्याचे शक्यता आहे. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला असून आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मुंबई पोलिस घटनास्थळी म्हणजेच त्याच्या वांद्रयाच्या घरी दाखल झाले आहेत. दरम्यान हे धक्कादायक वृत्त समोर येताच बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वांनीच या बातमीने आपल्याला धक्का बसल्याचे म्हणत सोबतच सुशांत याच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे. Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या

अक्षय कुमार

रितेश देशमुख

बिपाशा बासू

उर्मिला मातोंडकर

संजय दत्त

विवेक ओबेरॉय

जेनेलिया देशमुख

शिल्पा शेट्टी 

नवाझुद्दीन सिद्दिकी

रणविजय सिन्हा

कोयना मित्रा

करणवीर बोहरा

श्रद्धा कपूर सह सुशांत सिंह राजपूत 'छिछोरे' या शेवटच्या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पवित्र रिश्ता आणि किस देश में है मेरा दिल या मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती