Sushant Singh Rajput Family Statement: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रीया; दोषींना शिक्षा होणार असा व्यक्त केला विश्वास

सीबीआयकडे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सोपवल्याने सुशांतचे कुटुंबिय, चाहते यांच्यामध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

Sushant Singh Rajput Family (Photo Credit: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणी आज (19 ऑगस्ट) महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला. सीबीआयकडे (CBI) सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सोपवल्याने सुशांतचे कुटुंबिय, चाहते यांच्यामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत कुटुंबियांनी अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे. या स्टेंटमेंट द्वारे त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसंच दोषींना नक्कीच शिक्षा होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

"सुशांतचे मित्र, शुभचिंतक, मीडिया आणि जगभरातील कोट्यावधी चाहत्यांचे मनापासून आभार. सुशांतवर तुमचे असलेले अगाध प्रेमासाठी आणि आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत. आम्ही बिहारचे माननीय मुख्यमंत्री श्री. नितीश कुमार यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी न्याय प्रक्रीयेला गती दिली. आता तर देशातील सर्वात विश्वसनीय इन्वेस्टीगेटिंग एजेन्सीला या प्रकरणाचा तपास सोपवल्याने आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, दोषींना नक्कीच शिक्षा होईल." असे सुशांतच्या कुटुंबियांनी स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

ANI Tweet:

संस्थेवर लोकांचा विश्वास टिकून राहायला हवा. आजच्या निर्णयानंतर लोकशाहीवरील आमचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे. देशावर आमचे अतूट प्रेम आहे. ते आज अधिकच दृढ झाले, असे त्यांनी पुढे म्हटले आहे. (सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे 'या' बॉलिवूड कलाकरांनी केले स्वागत, View Tweets)

दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, मुंबई पोलिसांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणासंबंधित सर्व दस्तावेज सीबीआयकडे सुपूर्त करावे लागतील. त्यानंतर भविष्यातील या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सीबीआयद्वारे करण्यात येईल.