Sushant Singh Rajput Death Probe: रिया चक्रवर्ती मुंबई पोलिस, ED प्रमाणेच CBI चौकशीला देखील सामोरी जाईल: वकील सतिश मानशिंदे
रियाच्या मते कोणतीही तपास यंत्रणा असेल तरीही सत्य कायम राहणार आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूच्या तपासासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी आणि तपासाचे आदेश दिले आहेत. आता सुशांतच्या हत्येचा तपास निपक्षपाती होईल अशी भावना राजपूत कुटुंब आणि सुशांतच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) प्रतिक्रिया देखील तिचे वकील सतिश मानशिंदे (Satish Maneshinde) यांनी मीडीया समोर ठेवली आहे. दरम्यान रियाने स्वतःच सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता मुंबई पोलिस चौकशी आणि ईडी चौकशीला ती जशी समोरी गेली तशीच ती सीबीआय चौकशी, तपासाचादेखील सामना करेल असे म्हणाली आहे. रियाच्या मते कोणतीही तपास यंत्रणा असेल तरीही सत्य कायम राहणार आहे.
दरम्यान मुंबई पोलिसांकडून रिया चक्रवर्तीची दोनदा चौकशी झाली आहे. तर ईडी कार्यालयामध्येही रिया आणि तिच्या कुटुंबियांना बोलावण्यात आले होते. सध्या हा तपास सुरू आहे. Sushant Singh Rajput Case: 'बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य करण्याची रिया चक्रवर्ती ची लायकी नाही'- Bihar DGP गुप्तेश्वर पांडे यांची प्रतिक्रिया.
ANI Tweet
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रियाने सोशल मीडियामध्ये पोस्ट करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान रिया आणि सुशांत रिलेशनशीपमध्ये होते. ते लवकरच लग्न करणार होते. मात्र सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याचे मीडीया रिपोर्ट्समधून समोर आले होते. Sushant Singh Rajput Case: आदित्य ठाकरे यांच्याबाबत रिया चक्रवर्ती हिच्याकडून सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठे विधान.
दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पटना पोलिस स्थानकांत एफआयआर दाखल करताना रियाने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे आरोप केले आहेत.