Google Most Searched Indian Movie of 2021: सुर्याचा 'जय भीम' बनला 2021 चा गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला भारतीय चित्रपट
गुगल सर्च इंजिनने या वर्षी सर्वाधिक शोधल्या गेलेल्या भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे (Google Most Searched Indian Movie of 2021), ज्यामध्ये दक्षिण सुपरस्टार सुर्याचा (South Superstar Suriya) चित्रपट 'जय भीम' (Jai Bhim) पहिल्यास्थानी आहे.
कोरोना माहामारीमुळे अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 2021 हे वर्ष अनेक चढ-उतारांसह शेवटच्या टप्प्यावर आहे. यंदाही मनोरंजन विश्वात अशीच अस्थिरता पाहायला मिळाली. चित्रपटगृहे बहुतांश वेळ बंदच राहिली आणि ती उघडल्यावर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम दिले. या वर्षी अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट ओटीटी आणि थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. गुगल सर्च इंजिनने या वर्षी सर्वाधिक शोधल्या गेलेल्या भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे (Google Most Searched Indian Movie of 2021), ज्यामध्ये दक्षिण सुपरस्टार सुर्याचा (South Superstar Suriya) चित्रपट 'जय भीम' (Jai Bhim) पहिल्यास्थानी आहे.
सलमान खानचा 'राधे: द मोस्ट वाँटेड भाई', अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' आणि सूर्यवंशी, अजय देवगणचा 'भुज' आणि जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' यासह अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट यावर्षी रिलीज झाले. पण सर्व बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकत साऊथचा सुपरस्टार सुर्याच्या चित्रपट 'जय भीम'ने गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या बड्या स्टार्सच्या चित्रपटांचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही नाही. या यादीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. (हे ही वाचा Vicky-Katrina Marriage Pics: कतरिना-विकीचा सुंदर विवाह सोहळ्यातील पहिले फोटो शेअर.)
दुसऱ्या क्रमांकावर सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह' आहे
या यादीत सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह' चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेरशाह या वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरही प्रदर्शित झाला होता. शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. बड्या स्टार्सला मागे टाकत बॉलीवूड चित्रपटांमध्ये सिद्धार्थ अव्वल आहे. सलमान खानचा 'राधे' त्याच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे. राधे या वर्षी ईदच्या मुहूर्तावर ओटीटीवरही प्रदर्शित झाला होता. यामध्ये सलमानच्या सोबत दिशा पटानी दिसली होती.
2021 मध्ये भारतात सर्वाधिक गुगल केलेले 10 चित्रपटांची यादी
- जय भीम
- शेरशाह
- राधे द मोस्ट वाँटेड भाई
- बेल बॉटम
- इटर्नल्स
- मास्टर
- सूर्यवंशी
- गॉडझिला वि काँग
- दृश्यम् 2
- भुज
या वर्षी अनेक चित्रपटांनी चकित केले तर अनेक मोठ्या चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशाही केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)