Super 30: मुलाच्या चित्रपटाने 100 कोटींचा पल्ला गाठल्याच्या आनंदात जिम मध्येच थुईथुई नाचू लागली ऋतिक रोशनची आई, Watch Video

आणि तिचा व्हिडिओ बनविणा-या तिच्या लेकाला म्हणजेच ऋतिकला देखील आपल्या सोबत नाचायला सांगत आहे.

Pinky Roshan (Photo Credits: Instagram)

आनंद कुमार च्या भूमिकेला पुरेपूर न्याय देणा-या ऋतिक रोशनच्या (Hritik Roshan) 'सुपर 30' (Super 30) चित्रपटाने 10 दिवसांत 100 कोटींचा पल्ला गाठलाय. थोडक्यात सुपर 30 ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. यामुळे ऋतिक रोशनचे चाहतेही खूप खुश आहे. या चाहत्यांमध्ये सर्वात जास्त आनंद झालाय तो ऋतिकच्या सर्वात मोठ्या चाहत्याला म्हणजेच ऋतिकची आई पिंकी रोशन (Pinky Roshan) हिला.

या आनंदाच्या भरात ऋतिकच्या आईने चक्क जिम करतानाला केले असे काही जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल, पाहा व्हिडिओ

यात पिंकी रोशन ऋतिकच्या 'सुपर 30' चित्रपटातील करके गुस्ताकियाँ या गाण्यावर अगदी बेभान होऊन नाचताना दिसतेय. आणि तिचा व्हिडिओ बनविणा-या तिच्या लेकाला म्हणजेच ऋतिकला देखील आपल्या सोबत नाचायला सांगत आहे.

हेही वाचा- Super 30 Box Office Collection: ऋतिक रोशन च्या 'सुपर 30' चित्रपटाची सुपरफास्ट घोडदौड, 10 दिवसात गाठला 100 कोटींचा पल्ला

ऋतिकच्या आईच्या डान्स सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. ऋतिकने हा व्हिडिओ शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी ह्या व्हिडिओला खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहे. आई ही शेवटी आई असते, जबरदस्त अशा एकाहून एक भन्नाट कमेंट्स या व्हिडिओला आतापर्यंत मिळाल्या आहेत.

सिनेमातील हृतिकचा दमदार लूक आणि जबरदस्त डायलॉग्स लक्ष वेधून घेतात. शिक्षणाच्या माध्यमातून श्रीमंत-गरीब ही दरी मिटवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.