Super 30 Box Office Collection: ऋतिक रोशन च्या 'सुपर 30' चित्रपटाची सुपरफास्ट घोडदौड, 10 दिवसात गाठला 100 कोटींचा पल्ला
या चित्रपटाने केवळ 10 दिवसांत 100 कोटींचा पल्ला गाठला असून बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. चित्रपट विश्लेषक तरन आदर्शने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिलीय.
बॉलिवूडचा हँडसम हंक आणि उत्कृष्ट डान्सर अभिनेता ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) बहुचर्चित सिनेमा 'सुपर 30' (Super 30) नुकताच प्रदर्शित झाली. या चित्रपटाने केवळ 10 दिवसांत 100 कोटींचा पल्ला गाठला असून बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. चित्रपट विश्लेषक तरन आदर्शने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिलीय.
या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 75.85 कोटींची कमाई केली असून दुस-या आठवड्यात 24.73 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच 10 दिवसांत या चित्रपटाने एकूण 100.58 कोटींची कमाई केली आहे.
ऋतिक रोशन याने आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. त्यात यामध्ये बिहारची पार्श्वभूमी असल्याने ऋतिकचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कंगना रनौत हिच्या 'मेंटल है क्या' सिनेमाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी सिनेमा लवकर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील चित्रपटात महत्वाची भूमिका बजावत आहे.
हेही वाचा- Super 30: बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन च्या 'सुपर 30'ची धूम, दोन दिवसात बक्कळ कमाई
सिनेमातील हृतिकचा दमदार लूक आणि जबरदस्त डायलॉग्स लक्ष वेधून घेतात. शिक्षणाच्या माध्यमातून श्रीमंत-गरीब ही दरी मिटवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.