Sunny Leone PAN: सनी लियोन हिच्या पॅन क्रमांकाचा चुकीचा वापर, ऑनलाईन फसवणूक करुन घेतले कर्ज, सिबील स्कोर खराब

यात आता अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) हिचेही नाव जोडले गेले आहे.

Sunny Leone | (Photo credit: archived, edited, representative image)

सोशल मीडियावर पाठिमागील काही दिवसांपाूसन अनेक युजर्स इंडियाबुल्स (Indiabulls) चा फिनटेक प्लॅटफॉर्म धनी स्टॉक्स लिमिटेड (Dhani Stocks Limited) वर फसवणुकीची तक्रारकरत आहेत. यात आता अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) हिचेही नाव जोडले गेले आहे. सनी लियोन हिने आरोप केला आहे की, अज्ञात व्यक्तीने तिच्या पॅन क्रमांकाचा वापर करुन 2000 रुपयांचे लोन घेतले. तसेच, तिने आपली आयडेंटीटी चोरी झाल्याचा आरोप ही केला आहे. तसेच, या कर्जामुळे आपला सिबिल स्कोर (SIC) खराब झाल्याचा दावाही सनीने केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या सनी लियोन हिने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सनी लियोन हिने या प्रकरणाशी संबंधित एक वृत्त ट्विटरवर शेअर केले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, पॅन क्रमांकावर तिच्या माहितीशिवाय एकाने 2000 रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जामुळे आपला सिबिल स्कोर (SIC) खराब झाल्याचा दावाही तिने केला आहे. काही वेळानंतर सनीने आपल्या ट्विटर हँडलवरुन हे ट्विट हटवले आहे. (हेही वाचा, Sunny Leone सारख्या दिसणाऱ्या Aaveera Singh ची सोशल मीडियावर धूम; पहा Photos)

सनीने केलेल्या ट्विटनंतर हे प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. घोटाळ्याची शिकाल झालेल्या शेकडो लोकांना आता एजंट्सचे कॉले येत आहेत. तर काही लोकांच्या नावे शो कॉज नोटीसही जारी करण्यात आली आहे. पत्रकार आदित्य कालरा यांनी 13 फेब्रुवारीला ट्विटरवर म्हटले होते की, धनी अॅपने त्यांच्या नावे कर्ज दिले आहे. ज्यासाठी त्यांनी अर्जही केला नव्हता. आपल्या ट्विटमध्ये कालरा यांनी म्हटले की, इंडियाबुलसच्या तत्काळ सेवा देणाऱ्या धनी अॅपने सर्वांना पॅन क्रमांक वापरुन लोन दिले आहे.

दरम्यान, तक्रारी आल्यानंतर धनी अॅपने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. यात म्हटले आहे की, त्यांना कर्जासंबंधी तक्रारी मिळाल्या आहेत. अनेकांनी इतर व्यक्तींचे पॅन कार्ड वापरत मायक्रो लोन (Pan Card) घेतले आहे. या प्रकाराची पीडितांना माहितीही नाही.