सनी लियोनी हिच्या वाढदिवसानिमित्त पती डेनियल वेबर याची भावूक पोस्ट

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनी हिचा आज 37 वा वाढदिवस असून तिच्यावर सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Sunny Leone and Daniel Weber (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनी हिचा आज 37 वा वाढदिवस असून तिच्यावर सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र सनीच्या वाढदिवसानिमित्त पती डेनियल वेबर (Daniel Weber) याने तिच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे.

डेनियलने इंस्टाग्रामवर काही खास सनी सोबतचे काही खास फोटोज शेअर करत लिहिले की, "आता खूप साऱ्या गोष्टी डोक्यात येत आहेत. मात्र या सर्व एका पोस्टमध्ये मांडणे अशक्य आहे. तू सर्वात महान, उदार आणि विनम्र व्यक्ती आहेस. तू आयुष्यात स्वतःहून दुसऱ्यांसाठी अधिक करतेस, ते मी पाहिले आहे. तुझ्या प्रत्येक प्रवासात मी तुझ्यासोबत होतो आणि त्यानंतर आपण निवडलेल्या मार्गांवरही मी तुझ्यासोबत होतो. जगातील सर्वात महान महान महिलेला वाढदिवस आणि मातृदिनाच्या शुभेच्छा. तू सर्वाधिक सेक्सी आहेस."

डेनियल वेबर याची पोस्ट:

सनी आणि डेनियल यांना एक मुलगी आणि दोन जुळी मुले अशी तीन मुले आहेत.

डेनियलचा हा संदेश खरंच सुखावह आहे. सध्या याची सोशल मीडियात भलतीच चर्चा आहे.