Suhana Khan Video: रूमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदासोबत पार्टी करताना दिसली सुहाना खान; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

ज्यामध्ये दोन्ही स्टार किड्स लंडनमधील क्लबमध्ये एकत्र पार्टी करताना दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसले. यामुळे चाहत्यांनी असा अंदाज लावला की, ते मित्रांपेक्षा जास्त आहेत.

Suhana Khan-Agastya Nanda Video (PC - X/@jviciouslady)

Suhana Khan Video: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) ची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेस आणि लूकमुळे तर कधी तिच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे. सुहानाने 'द आर्चिज'मधून अभिनयात पदार्पण केले. आता ती शाहरुख खानसोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, सुहाना तिच्या अफवा असलेल्या बॉयफ्रेंडसोबत लंडनमध्ये दिसली आहे. वास्तविक, सुहाना आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) जेव्हापासून त्यांनी 'द आर्चिज'चे शूटिंग केले तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. तेव्हापासून हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत.

आता सुहाना आणि अगस्त्य नंदा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. ज्यामध्ये दोन्ही स्टार किड्स लंडनमधील क्लबमध्ये एकत्र पार्टी करताना दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसले. यामुळे चाहत्यांनी असा अंदाज लावला की, ते मित्रांपेक्षा जास्त आहेत. (हेही वाचा - King : शाहरुख आणि लेक सुहाना खान दिसणार एकाच चित्रपटात; सिद्धार्थ आनंद यांच्या डॉनमध्ये साकारणार भूमिका)

ट्विटरवर एका फॅन पेजने सुहानाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओ शेअर करताना दावा करण्यात आला होता की, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एका नाईट क्लबमध्ये दिसत आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा काळ्या शर्टमध्ये तिच्यासमोर उभा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पहा व्हिडिओ - 

सुहाना खानने झोया अख्तरच्या ओटीटी रिलीज 'द आर्चीज'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आता ती तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या चित्रपटात ती दिसणार आहे.