Stree 2 Collection: श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका; थेट शाहरुख खानला दिली टक्कर, लक्ष 600 कोटीवर

सिनेमा आता शाहरुखच्या ‘जवान’लाही टक्कर देताना दिसत आहे.

Photo Credit- Instagram

Stree 2 Collection: श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (RajKummar Rao)यांचा ‘स्त्री 2’  एकामागोमाग एक रेकॉर्ड मोडत आता सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. एवढंच काय तर आता ‘स्त्री 2’ हा सिनेमा शाहरुखच्या(Shahrukh Khan)‘जवान’(Jawan)लाही टक्कर देत आहे. ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडी सिनेमाचा डंका सुरू असून कमाईला ब्रेकच लागत नसल्याचे दिसत आहे. सोमवारी चित्रपटाची एकूण कमाई 583.35 कोटींवर पोहचली होती. (हेही वाचा: Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर जादू कायम, 600 कोटींचा टप्पा गाठणार)

‘स्त्री 2’ 15 ऑगस्टला रिलीज झाला आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हा हॉरर कॉमेडी चित्रपट महिनाभरानंतरही लोकांची मने जिंकत आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवार 16 सप्टेंबरपर्यंत ‘स्त्री 2’ची एकूण कमाई 583.35 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे आता 600 कोटींचा टप्पा चित्रपट काही दिवसातच गाठेल यात काही शंकाच नाही. ‘सकनिल्क’च्या अहवालानुसार ‘स्त्री 2’ने 34 व्या दिवशी मंगळवार, 17 सप्टेंबर रात्री 9:50 वाजेपर्यंत 2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘Stree 2’चे एकूण कलेक्शन 585.35 कोटी रुपये झाले आहे. आता या चित्रपटाचे पुढचं टार्गेट 600 कोटी क्लबचं आहे.

दरम्यान, ‘स्त्री 2’चं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. निरेन भट्ट यांनी हा लिहिला असून 2018 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘स्त्री’चा हा सिक्वेल आहे. ‘स्त्री 2’मध्ये श्रद्धा आणि राजकुमारशिवाय अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जीसारख्या स्टार्सची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

अलीकडेच, ‘स्त्री 2’ने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’चे रेकॉर्ड तोडले होते. आता श्रद्धाचा सिनेमा शाहरुखला टक्कर देताना दिसतोय. भारतीय बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या ‘जवान’नंतर ‘स्त्री 2’ हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट बनला आहे.