Kajal Aggarwal Getting Married to Gautam Kitchlu: दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला गौतम किचलू सोबत अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर केली घोषणा
काजलने ही गोड बातमी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी काजल गौतमसोबत मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
Kajal Aggarwal Getting Married to Gautam Kitchlu: दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) हिने आज गौतम किचलूसोबत (Gautam Kitchlu) तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. काजलने ही गोड बातमी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी काजल गौतमसोबत मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काजलच्या लग्नाच्या सोहळ्यात केवळ तिच्या कुटुंबातील सदस्यचं उपस्थित असणार आहेत. काजल आणि गौतम अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा विचार करत आहे.
काजलने आपल्या इन्स्टाग्रामवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे की, मी 30 ऑक्टोबर रोजी गौतम किचलू यांच्याशी मुंबईत एका खासगी विवाह सोहळ्यात लग्न करणार आहे. या लग्न सोहळ्यात कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित असतील. कोरोना महामारीमुळे आमच्या आनंदावर थोड्या फार प्रमाणात विरजन पडलं आहे. परंतु, आम्ही या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहोत आणि आम्ही आशा करतो की, आपणदेखील यासाठी आम्हाला चीअर कराल. वर्षानुवर्षे तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मला आवडणारं प्रेक्षकांच मनोरंजन करण्याचं काम मी करत राहील. आपल्या सर्वांच्या सपोर्टसाठी धन्यवाद.' (हेही वाचा - Disha Patani Hot Look In Yellow Monokini: दिशा पटानी ने शेअर केला पिवळ्या रंगाच्या मोनोकिनीतील फोटो; Watch Photo)
या पोस्टमध्ये काजलने हे देखील स्पष्ट केले आहे की, लग्नानंतरदेखील ती चित्रपटांमध्ये काम करत राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काजल आणि गौतमच्या लग्नाबद्दलही बातम्या माध्यमात झळकत होत्या. आज अखेर काजलने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. काजच्या या घोषणेनंतर तिला अनेकांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.