Nayanthara X Account Hacked: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराचे 'एक्स' अकाउंट हॅक; सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली माहिती
यासंदर्भात पोस्ट करताना नयनताराने लिहिले, 'माझे खाते हॅक झाले आहे. कृपया पोस्ट केल्या जाणाऱ्या कोणत्याही अनावश्यक किंवा विचित्र ट्विटकडे दुर्लक्ष करा.' एक्सवरील तिच्या शेवटच्या पोस्टनंतर अभिनेत्रीने ही पोस्ट केली.
Nayanthara X Account Hacked: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) चे 'एक्स' अकाउंट हॅक (X Account Hacked) झाले आहे. अभिनेत्रीने शुक्रवारी सोशल मीडियावर आपले एक्सचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती शेअर केली. अभिनेत्रीने पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांना विनंती केली की, तिच्या खात्यातील कोणत्याही असामान्य पोस्टकडे दुर्लक्ष करावे.
यासंदर्भात पोस्ट करताना नयनताराने लिहिले, 'माझे खाते हॅक झाले आहे. कृपया पोस्ट केल्या जाणाऱ्या कोणत्याही अनावश्यक किंवा विचित्र ट्विटकडे दुर्लक्ष करा.' एक्सवरील तिच्या शेवटच्या पोस्टनंतर अभिनेत्रीने ही पोस्ट केली. (हेही वाचा - Nayanthara Apologises Post Annapoorani Controversy: अन्नपूर्णानी वादानंतर नयनताराने मागितली माफी; म्हणाली, 'जय श्री राम, कोणाच्याही भावना दुखावण्याचा कधीच हेतू नव्हता')
नयनताराचे 'एक्स' अकाउंट हॅक, चाहत्यांना पोस्टद्वारे दिली माहिती -
Account has been hacked. Please ignore any unnecessary or strange tweets being posted.
— Nayanthara✨ (@NayantharaU) September 13, 2024
नयनताराने एक्सवर 'जवान' चित्रपटासंदर्भात केली होती शेवटची पोस्ट -
नयनताराने एक्स अकाऊंट हॅकिंगबद्दल सांगण्यापूर्वी, शेवटची पोस्ट 'जवान'च्या एक वर्षाच्या वर्धापन दिनासंदर्भातकेली होती. या महिन्याच्या सुरुवातीला, अभिनेत्रीने शाहरुख खान स्टारर चित्रपटाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग साइटवर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'जवानला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चीफ ऍटलीकडून अभिनंदन. शाहरुख खान, विजय सेतुपती आणि चाहत्यांनी याला खूप महत्त्व दिले आहे.' (हेही वाचा - Annapoorani Controversy: नेटफ्लिक्सवरून काढला 'अन्नपूर्णी' चित्रपट; 'प्रभू रामाचा अनादर' केल्याप्रकरणी अभिनेत्री Nayanthara विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
'जवान' चित्रपटातून केले बॉलिवूडमध्ये पदार्पण -
'जवान' हा शाहरुख खान आणि दिग्दर्शक 'अटली'चा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर तो हिट ठरला. शाहरुख आणि नयनतारा व्यतिरिक्त या चित्रपटात दीपिका पदुकोण, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, लहर खान, गिरिजा ओक आणि संजीता भट्टाचार्य यांचा समावेश आहे.
अभिनेत्री नयनतारा काही दिवसांपूर्वी हिबिस्कसच्या फुलांपासून चहा बनवण्याचे फायदे सांगून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. त्यांच्या या पोस्टनंतर ‘द लिव्हर डॉक्टर’ने कडाडून विरोध केला होता. याला प्रतिसाद म्हणून अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या सर्व प्रकारानंतर तिने आपली हिबिस्कस चहाची पोस्ट काढली होती.
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2024 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

