Sooryavanshi and 83 Release: जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते 'सूर्यवंशी' आणि '83' चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा!
लवकरच किंबहुना जानेवारी 2021 च्या महिन्याच्या शेवटी सूर्यवंशी आणि 83 या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे बहुचर्चित चित्रपट 'सूर्यवंशी' (Sooryavanshi )आणि '83' (83) लांबणीवर पडले. लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृहे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता अनलॉकच्या टप्प्यात हळूहळू चित्रपटगृह सुरु झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना काळात रखडलेले चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान आता लवकरच किंबहुना जानेवारी 2021 च्या महिन्याच्या शेवटी सूर्यवंशी आणि 83 या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसे कोरोनामुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहांकडे पाठ फिरवली असून म्हणावा तितका प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊनपासून अनेक बिग बॅनरचे चित्रपट हे OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्याने लोकांनी मनोरंजनाचे माध्यम म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मला चांगलीच प्रसिद्धी दिली. मात्र 'सूर्यवंशी' आणि '83' च्या निर्मात्यांनी हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्याकडे पाठ फिरवली आणि चित्रपटगृहे कधी सुरु होतील याची प्रतिक्षा केली. ही प्रतिक्षा आता संपल्यामुळे लवकरच हे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतील असे शक्यता वर्तवली जात आहे.हेदेखील वाचा- Rishi Kapoor यांच्या निधनानंतर अर्धवट राहिलेला 'शर्माजी नमकीन' चित्रपट परेश रावल करणार पूर्ण; 'या' तारखेला होणार रिलीज
दरम्यान दक्षिण फिल्म इंडस्ट्री याच्या उलट परिस्थिती आहे. येथे विजय सेतुपतिचा चित्रपट 'मास्टर' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी सिनेमागृहात प्रचंड गर्दी केली. त्यामुळे या चित्रपटाने चांगली कमाई देखील केली.
त्यामुळे मुंबईतही असे बिग बॅनर चित्रपट प्रदर्शित व्हावे अशी मागणी डिस्ट्रीब्यूटर्स आणि एक्स्हिबिटर्स करत आहे. त्यात 'सूर्यवंशी' आणि '83' या चित्रपटांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुपचे असल्यामुळे या ग्रुपचे सीईओ शिबशिश सरकार म्हणाले की, 'हा निर्णय चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि अन्य कलाकारांचा असेल. मी त्यांना मागील 10-12 दिवसांपासून भेटलो सुद्धा नाही. माझी इच्छा आहे की हे दोन्ही चित्रपट मार्च महिन्याच्या शेवटी रिलीज होतील.'
रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, अजय देवगण आणि कैटरिना कैफ अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. तर कबीर सिंह दिग्दर्शित '83' मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटांची उत्सुकता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)