मुंबई विमानतळावर मदत मागणाऱ्या व्यक्तीला Sonu Sood ने दिले 'हे' उत्तर (Watch Video)
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेतही गरजूंची मदत करण्यासाठी अभिनेता पुढे सरसावला आहे. त्याचे हे रुप मुंबई विमानतळावर देखील दिसून आले.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) पुन्हा एकदा लोकांच्या मदतीला धावून आला आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेतही (Coronavirus Second Wave) गरजूंची मदत करण्यासाठी अभिनेता पुढे सरसावला आहे. त्याचे हे रुप मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) देखील दिसून आले. रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी करणाऱ्या एका व्यक्तीसाठी त्याने मदतीचा हात पुढे केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोनू सूद ची ही कृती चाहत्यांचे मन पुन्हा जिंकेल यात वाद नाही.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, सोनू सूद मुंबई एअरपोर्टवर असताना त्याला एका व्यक्तीने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी मदत मागितली. त्यावर सोनूने तुमचा नंबर आणि पत्ता द्या, असे म्हटले आहे. याशिवाय सोनू सूद चाहत्यांसोबत सेल्फी काढतानाही दिसत आहे.
पहा व्हिडिओ:
सध्या सुरु असलेल्या कोविड-19 संकटात सोनू सूद सातत्याने मदत करत आहे. ऑक्सिजन, कोरोना औषधं उपलब्ध करुन देण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो अनेकांच्या समस्या दूर करताना दिसत आहे. एअरपोर्टवर देखील त्याचे हे रुप दिसून आले. (अभिनेता सोनू सूद याची COVID19 ची चाचणी निगेटिव्ह, चाहत्यांकडून आनंद व्यक्त)
मध्यरात्री असंख्या कॉल केल्यावर जर तुम्ही गरजूंना बेड मिळवून देत असाल. ऑक्सिजन पुरवून लोकांचे प्राण वाचवत असाल. तर हे कोणत्याही 100 कोटींच्या सिनेमात काम करण्यापेक्षा दहा लाख पट अधिक समाधानकारक आहे. लोकं हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी धडपडत असतात तेव्हा झोप लागत नाही, असं सोनू सूद याने यापूर्वी एका ट्विटद्वारे म्हटले होते.