Sonu Sood ने परत घेतली सुप्रीम कोर्टातील BMC च्या नोटीसी विरोधातील याचिका
त्यानंतर नोटीसीला उत्तर देण्यासाठी सोनू सूदने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. बॉम्बे हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात सोनू सूदने दाद मागितली.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला रहिवासी इमारतीचं हॉटेलमध्ये रूपांतर केल्याबद्दल बीएमसीने (BMC) नोटीस बजावली होती. त्यानंतर नोटीसीला उत्तर देण्यासाठी सोनू सूदने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. बॉम्बे हायकोर्ट (Bombay High Court) आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सोनू सूदने दाद मागितली. परंतु, काही दिवसांपूर्वी बीएमसीच्या नोटीसीविरुद्धची याचिका सोनू सूदने परत घेतली आहे. रिपोर्टनुसार, सोनू सूदचे वकील मुकुल रोहतगी यांनी याचिका परत घेत असल्याचे सांगितले. तसंच बीएमसी सोबत चर्चेने हा विषय सोडवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
सुप्रीम कोर्टाने देखील बीएमसीला हा मुद्दा आपआपासांत सोडवण्याचा आणि सूद विरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, सोनू सूदने याचिका मागे घेतली असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. (Sonu Sood Illegal Construction Row: बीएमसी नोटीसी विरुद्धची याचिका Bombay High Court ने फेटाळल्यानंतर सोनू सूद ची Supreme Court त धाव)
Sonu Sood Tweet:
काय आहे प्रकरण?
जुहू एबी नायर रोडवरील शक्तीसागर येथील निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतरण करण्यापूर्वी सोनू सूदने संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचा आरोप पालिकेने केला आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बीएमसीने सूदला यासंदर्भात नोटीस दिली होती. पालिकेच्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, "जागेची पाहणी केली असता आरोपींनी मागितलेली कागदपत्रे सादर केली नाहीत आणि नोटीस बजावल्यानंतरही अनधिकृत बांधकामांचे काम चालूच ठेवले.
या विरुद्ध सोनू सूद याने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर सोनूने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.