Sonu Sood चा संयुक्त राष्ट्र कडून SDG Special Humanitarian Action Award ने सन्मान; कोरोना संकटकाळात गरजूंना केलेल्या मदतीची दखल
यूनाइटेड नेशन्स द्वारा सोनू सुदला एसडीजी स्पेशल ह्यूमैनीटेरीयन एक्शन (SDG Special Humanitarian Action)प्रदान करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सुद (Sonu Sood) याने कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात अनेक गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. कुणासाठी अन्न पाण्याची सोय केली तर काहींना मूळगावी पोहचवण्यासाठी मोफत सेवा दिली. त्याच्या कामाचा ओघ अजूनही सुरूच आहे. त्याच्या याच समाजिक भान जपत मदतीसाठी पुढे येण्याच्या गुणाचा गौरव करत संयुक्त राष्ट्राने (United Nations) त्याचा सन्मान केला आहे. यूनाइटेड नेशन्स द्वारा त्याला एसडीजी स्पेशल ह्यूमैनीटेरीयन एक्शन (SDG Special Humanitarian Action)प्रदान करण्यात आला आहे. कोरोना संकटात सोनूने केलेल्या सढळ मदतीच्या अनेक कहाण्या समोर आल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेता सोनू सुद हा अनेक खलनायकी रूपात रसिकांसमोर आला असला तरीही वास्तवात मात्र त्याचं 'हिरो'चं रूप पहायला मिळालं आहे. त्याचे आभार मानण्यासाठी अनेकांनी कलात्मक गोष्टी शेअर केल्या आहेत. काहींनी त्यांच्या नव्या व्यवसायाचा श्रीगणेशा करत दुकानाचं नाव 'सोनू' ठेवलं तर काहींनी आपल्या नवजात बालकाचं नाव 'सोनू' ठेवलं आहे. अभिनेता सोनू सूदने बर्थ डे दिवशी 3 लाख नोकरींची केली घोषणा; Amazon, Sodexo सह बड्या कंपन्यांसोबत करार.
ANI Tweet
मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. अशावेळेस सरकारने लॉकडाऊन जाहीर करताच विविध ठिकाणी अडकलेल्यांना मोफत सेवा पुरवण्याचं काम सोनू सूदने केले आहे. गरजवंतांना मदत केली आहे. त्यामुळे अनेकांना पुन्हा आयुष्यात नवी सुरूवात करण्याची संधी मिळाली आहे.
सोनू सुदच्या मदतीची दखल घेत त्याचं कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देखील केले आहे. त्यांची सोनूने प्रत्यक्ष भेट देखील घेतली आहे. मात्र आज युएनने केलेला गौरव हा व्हर्च्युअल मिटिंगद्वारा करण्यात आला आहे.