माझ्या नादी लागलास तर, मरीना कंवरचा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर पब्लिश करील; गायक सोनू निगम यांचा भूषण कुमार ला इशारा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर (Suicide) बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर टिका केली. प्रसिद्ध गायक सोनू निगमनेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत म्युझिक इंडस्ट्रीतील काही धक्कादायक खुलासे केले होते. 'सुशांतने आत्महत्या केली, म्युझिक इंडस्ट्रीतही अशा घटना घडू शकतात. म्युझिक इंडस्ट्रीतही काही म्युझिक माफिया आहेत. ते गायकांचे नशीब घडवतात, बिघडवतात. कोणता सिंगर गाणार, कोणता नाही, हे ते ठरवतात,' असंही सोनूने व्हिडिओमध्ये म्हटलं होतं.

Sonu Nigam - Bhushan Kumar controversy (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर (Suicide) बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर टिका केली. प्रसिद्ध गायक सोनू निगमनेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत म्युझिक इंडस्ट्रीतील काही धक्कादायक खुलासे केले होते. 'सुशांतने आत्महत्या केली, म्युझिक इंडस्ट्रीतही अशा घटना घडू शकतात. म्युझिक इंडस्ट्रीतही काही म्युझिक माफिया आहेत. ते गायकांचे नशीब घडवतात, बिघडवतात. कोणता सिंगर गाणार, कोणता नाही, हे ते ठरवतात,' असंही सोनूने व्हिडिओमध्ये म्हटलं होतं.

यानंतर सोनू निगमने पुन्हा एकदा नवा व्हिडिओ शेअर करत टी- सीरिजचा सर्वेसर्वा भूषण कुमार यांच्यावर टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये सोनूने भूषण कुमारला इशारा देताना म्हटलं आहे की, ‘ तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. पुन्हा माझ्या नादी लागलास तर, मरीना कंवरचा व्हिडीओ माझ्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करील.’ (हेही वाचा - Amrish Puri Birth Anniversary: दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्या नायकापेक्षाही अधिक गाजलेल्या '5' खलनायकाच्या भूमिका)

नेमकी काय म्हणाला सोनू निगम ?

लातों के भूत बातों से नहीं मानते. प्रामाणिकपणाची भाषा सर्वांना समजते असे नाही. मी खूप चांगल्या पद्धतीने बोललो होतो, की तुम्ही नवीन कलाकारांसोबत प्रेमाने वागा. कारण, आत्महत्या झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा त्यापूर्वी वातावरण बदललेलं चांगलं. मात्र, जे माफिया आहेत ते त्याचं पद्धतीने वागणार. मी कोणाचंच नाव घेतलं नव्हतं. पण त्यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी पाच-सहा जणांच्या मुलाखती घेतल्या. याच पाच-सहा जणांपैकी एकाच्या भावाने दीड वर्षापूर्वी एक ट्विट केलं होतं.

View this post on Instagram

You might soon hear about Suicides in the Music Industry.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

भूषण कुमार, आता तर मला तुझं नाव घ्यावंच लागेल. तु चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. जेव्हा तू माझ्या घरी येऊन मला विनंती करायचास, ती वेळ विसरलास तू. भावा माझा म्युझिक अल्बम कर, स्मिता ठाकरे यांच्याशी माझी भेट करून दे, बाळासाहेब ठाकरे, सहारा श्री यांच्याशी भेट करून दे. अबू सालेमपासून मला वाचव, अशी विनवणी तू माझ्याकडे केली होती. विसरलास का ते दिवस? आता तू माझ्या नादी लागू नकोस. मरीना कंवर लक्षात आहे ना? ती का बोलली आणि नंतर तिने माघार का घेतली? हे मला नाही माहित. हे माध्यमांना माहित आहे. तिचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. जर तू माझ्याशी पंगा घेतलास तर, तो व्हिडीओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करीन, असा इशाराही सोनूने या नव्या व्हिडिओमध्ये भूषण कुमारला दिला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now